आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन हेलिकॉप्टरची हवेतच टक्कर:ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनाऱ्यावर 2 हेलिकॉप्टरची हवेत टक्कर, पायलटसह चार ठार, 13 जखमी

मेलबर्नएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उड्डाण घेणाऱ्या हेलिकाॅप्टरवर दुसरे उतरणारे हेलिकॉप्टर धडकले

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडच्या समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी दोन हेलिकॉप्टरची हवेतच टक्कर झाली. पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या या समुद्रकिनाऱ्यावर अपघात होताच धावपळ उडाली. एका हेलिकॉप्टर सुखरूपपणे जमिनीवर उतरले. मात्र दुसरे हेलिकॉप्टर धाडकन किनाऱ्यावरील वाळूत कोसळून त्याचा चक्काचूर झाला.

सहा गंभीर : एक उड्डाण घेत असताना दुसरे उतरणारे हेलिकॉप्टर त्याच्यावर धडकले. यामध्ये पायलटसह ४ जण ठार झाले असून १३ जखमी झाले आहेत. त्यापैकी सहा जण गंभीर आहेत. सुखरूप उतरलेल्या हेलिकॉप्टरमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...