आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:अमेरिकेत ओमायक्रॉनचे 2 व्हेरिएंट, नव्या बाधितांपैकी 16 टक्क्यांचा समावेश

अमेरिका16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत कोरोनाच्या नव्या बाधितांमध्ये १३ टक्के रुग्णांत ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट BA.4 व BA.5 यामुळे बाधा झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण तथा निवारण केंद्र (सीडीसी) या संस्थेने हा दावा केला आहे. मार्चमध्ये या दोन सब व्हेरिएंट्सला निगराणी यादीत समाविष्ट केले होते. त्यास व्हेरिएंट ऑफ कन्सर्न असे संबोधले गेले. अमेरिकेतील सर्व भागात दोन्ही सबव्हेरिएंट आढळून येत आहेत. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील संशोधकाच्या अभ्यासात ओमायक्रॉनचे व्हेरिएंट शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीला चकवा देण्यास सक्षम आहे. हेच नव्या लाटेचे कारण ठरू शकते.

शांघायमध्ये पुन्हा लॉकडाऊन : चीनच्या शांघायमध्ये सामूहिक तपासणीसाठी पुन्हा सात जिल्ह्यांत अस्थायी लॉकडाऊन लागू झाला आहे. चीनच्या शून्य कोविड धोरणा अंतर्गत बाधित व त्यांच्या संपर्कातील सर्वांना आयसोलेट करण्यात येणार आहे. ते वास्तव्याला असलेल्या संपूर्ण इमारतीला क्वारंटाईन केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...