आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाॅशिंग्टन:अमेरिकेत वर्षभरात 2 काेटी बंदुकांची विक्री; सुरक्षेसाठी बंदूक विक्रीत वाढ, काडतुसांचा पुरवठा ठप्प

वाॅशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत काेराेनाकाळात बंदुकीच्या विक्रीत वाढ झाली आहे. लाेकांना सामाजिक अशांतता व गुन्ह्याची भीती वाटत आहे. नागरिक सुरक्षेसाठी बंदूक खरेदी करत आहेत. साेबतच शिकारीसाठी देखील बंदुकांची खरेदी केली जात आहे. कारण लाेकांकडे फावला वेळ आहे. विशेष म्हणजे बंदूक खरेदी करणाऱ्यांत ४० टक्के महिला आहेत. त्यात सिंगल मदर, वृद्धांचाही समावेश आहे.

बंदुकीच्या गाेळ्यांचा पुरवठा खूप कमी झाला आहे. बंदूक गाेळ्यांच्या निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार ते जास्तीत जास्त उत्पादन करत आहेत. परंतु बंदुकीच्या गाेळ्यांच्या दुकानांत जागा कमी आणि किंमत जास्त आहे. पुरवठा कमी हाेण्याचा परिणाम नॅशनल लाॅ एनफाेर्समेंट फायरआर्म्स इन्स्ट्रक्टर्स असाेसिएशनवरही पडला आहे. असाेसिएशनचे कार्यकारी संचालक जेसन वुस्टेनबर्ग म्हणाले, अनेक बंदूक प्रशिक्षकांनी आपल्या नावाची नाेंदणी रद्द केली आहे.

काम करत असलेल्या एजन्सीतून गाेळ्यांचा पुरवठा हाेत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनाही गाेळ्या मिळत नाहीत. न्यूयाॅर्कमध्ये बंदूक डीलर आर्डेन फ्रॅजिन म्हणाले, लष्करी शैलीची एआर-१५ रायफलींचा माेठी मागणी आहे. त्याचा साठा खूप लवकर विकला जाताे. पहिल्यांदा महामारीदरम्यान ८ एम किंवा ९ एमच्या बंदुकींची िवक्री करण्यात आली आहे.

शाॅटगनची १२-गेज, हँडगनची ९ मिमी व लष्करी पद्धतीची .५५६ गाेळ्यांना जास्त मागणी आहे. गिफडर्स लाॅ सेंटरचे अरी फेइलिच म्हणाले, काेराेनाच्या सुरुवातीला आम्ही नागरिकांना टाॅयलेट पेपर, किटाणूनाशकाचा साठा करताना पाहिले हाेते. आता लाेकांना गाेळ्यांची साठेबाजी करताना पाहता आहाेत. आपण बंदुकीने हाेणारा हिंसाचार राेखला पाहिजे. अमेरिकेत बंदूक विक्रीमुळे सार्वजनिक ठिकाणच्या हिंसाचारात वाढ झाली आहे.

अमेरिकेत ५ काेटी लाेकांचा नेमबाजीत सहभाग
राष्ट्रीय नेमबाजी क्रीडा फाउंडेशननुसार अमेरिकेत ५ काेटींहन जास्त लाेक नेमबाजीच्या खेळात सहभागी हाेतात. २०२० मध्ये अमेरिकेत २ काेटी बंदुकींचा विक्री झाली हाेती. २०१९ च्या तुलनेत ही ५८ टक्के जास्त खरेदी आहे. त्यात ८४ लाख लाेकांनी पहिल्यांदाच बंदूक खरेदी केली. एकूण खरेदी करणाऱ्यांत महिलांचे प्रमाण ४० टक्के हाेते. एफबीआय नॅशनल इंटंट क्रिमिनल बॅकग्राऊंड चेक सिस्टिम डेटाबेसनुसार जून २०२१ पर्यंत ६ महिन्यांत २.२२ काेटी बंदुकांची विक्री झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...