आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेतील तुरुंगात कैद्यांची अवस्था दयनीय झाली आहे. तुरुंगात कैद बिगर दस्तऐवजांच्या कैद्यांकडून बळजबरीने मजुरी करून घेतली जात आहे. याद्वारे तुरुंग मोठी कमाई करत आहे. मात्र,त्यांना समान पेमेंट केले जात नाही. एका मानवी हक्क पाहणीत उघड झालेली माहिती धक्कादायक आहे. अमेरिकी तुरुंग उद्योग झाला आहे. कैद्यांकडून काम करवून दरवर्षी ११ अब्ज डॉलर म्हणजे, ९१ हजार कोटी रुपये कमाई केली जाते. मात्र, कैद्यांना केवळ एका तासाचे वेतन मिळते. त्यांची वार्षिक किमान मजुरी ४५० डॉलर निश्चित केली आहे. हे बाह्य जगतातील किमान वेतनाच्या शून्य आहे.
अमेरिकेतील तुरुंगात २० हजार बिगर दस्तऐवजांचे कैदी आहेत. तपासकर्ते जेनिफर यांनी भास्करला सांगितले की, त्यांची स्थिती दयनीय आहे. तुरुंगांचा दावा आहे की, कैद्यांना योग्य वेतन देण्याइतपत त्यांच्याकडे निधी नाही.मात्र, आमचा तपास सांगतो की, ते अब्जावधी डॉलर्स कमावत आहेत, तरीही कैद्यांचे शोषण करत आहेत. अनेकदा त्यांच्याकडे तुरुंगात साबण खरेदी आणि एक फोन करण्याइतपत पैसे नाहीत.
अमेरिकेतील खासगी कंपन्या तुरुंग चालवतात. या तुरुंगात जेवढे जास्त कैदी असतील, कंपन्यांना सरकार तेवढे जास्त अनुदान देते. तुरुंगातील ८०% कामे त्यातील कैद्यांकडून करवून घेतली जातात. यामध्ये स्वच्छता, दुरुस्तीची कामे, कपडे धुणे आणि अन्य कामाचा समावेश आहे. याशिवाय बाहेरच्या कंपन्याही तुरुंगाना टेबल-खुर्चीसह अन्य सामग्री बनवण्याचे कंत्राट देतात. जे कैदी काम करण्यास नकार देतात त्यांना कोठडीत एकटे ठेवले जाते.
एका वर्षात दस्तऐवज नसल्याने भारतीयांची दुप्पट अटक
शाकाहारींना जेलमध्ये मांस खावे लागत आहे
मेक्सिकोमार्ग अमेरिका सीमेतून घुसरलेले भारतीय वंशाचे पंजाबीने सांगितले की, एका वर्षापासून तुरुंगात आहे. हे माझ्यासाठी वाईट स्वप्नासारखे आहे. आम्हाला तेथे पगडी व कडे वापरण्याची परवानगी नाही. जे शाकाहारी आहेत,त्यांना बळजबरीने मांस खावे लागत आहे.
वर्ष अटक
2022 - 60,000
2021 - 31000
2020 - 20000
2019 - 9,000
2018 - 4,197
* संख्या फक्त भारतीयांची आहे.
वकिलांची फीस न देऊ शकणारे तुरुंगात
सीमापार घुसखोरी करण्याच्या बहुतांश प्रकरणातील कैद्यांना एका वर्षाच्या आत जामीन मिळतो. अनेकदा कैद्याला वकिलाचा खर्चही देता येत नसल्याने ते तुरुंगात अडकून आहेत. यंदा अटकेतील ६० हजारांपैकी ४० हजार भारतीयांना जामीन मिळाला. २० हजार जेलमध्ये आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.