आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुबईत कोविडनंतरची पर्यटन क्षेत्रातील वाढ लक्षणीय अशी म्हणावी लागेल. कारण अमिरातमध्ये यंदाच्या पहिल्या चार महिन्यांत पर्यटकांचा मोठा ओघ देशात आल्याचे दिसून आले. तशी नोंद करण्यात आली आहे. जानेवारी-एप्रिल २०२२ या कालावधीत शहराला ५१ लाखांवर पर्यटकांनी भेट दिली आहे. अर्थात, हा २०३ टक्के मोठी वाढ झाली आहे.
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन अमिरातने हॉटेल व्यवस्थेत सुधारणा करण्यावर भर दिला. हॉटेल बुकिंगसाठी मदत करण्यात आली. यंदा सुरुवातीलाच हॉटेल बुकिंग ७६ टक्क्यांवर पोहोचली. दुबईत जानेवारी ते मार्च २०२२ पर्यंत रात्रीच्या कालावधीत ४० लाखांवर पर्यटकांनी हजेरी लावली होती.
पहिल्या तिमाहीत हॉटेलचा वापर करण्यात शहराने विक्रम स्थापन केला. आता शहर जगात पहिल्या क्रमांकावर आहे. महामारीला सर्वात यशस्वीपणे हाताळणे व जगातील सर्वात सुरक्षित शहर अशा प्रतिमेमुळे दुबई, यूएईविषयी परदेशी पर्यटकांना जास्त विश्वास आहे. महिलांना एकटे फिरण्यासाठी सर्वात सुरक्षित जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर असा लौकिकदेखील अलीकडेच दुबईला मिळाला आहे. गुन्हेगारीचे प्रमाणही सर्वात कमी असल्याने पर्यटकांचे हे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे.
एसटीआर ग्लोबलच्या प्राथमिक आकडेवारीनुसार दुबईतील हॉटेल उद्योगाचे उत्पन्न २०१९ च्या ईदच्या तुलनेत अनेकपटीने जास्त असल्याचे दिसून आले. ईदच्या काळात हे प्रमाण ७५.४ टक्के एवढे होते. महामारीपूर्वीच्या तुलनेत ते १९.७ टक्क्यांनी जास्त होते.
भारतातून अनेक पर्यटकांची सुटीत संयुक्त अरब अमिरातला पसंती
संयुक्त अरब अमिरातविषयी पर्यटकांच्या पसंतीविषयी मुसाफीर डॉट कॉमचे रहेश बाबू म्हणाले, आता येणारे पर्यटक बहुतांश मित्र, कुटुंबीयांना भेटण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांपैकी आहेत. सध्या भारतात शाळेला सुटी आहे. त्यामुळे अनेक लोक नातेवाइकांसोबत सुटी घालवण्यासाठी येथे आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.