आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:21 वर्षीय कॅनेडियन शीख तरुणीची गोळी घालून हत्या

ओंटारियो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडातील ओंटारियो प्रांतात २१ वर्षीय कॅनेडियन शिख तरुणीची गोळी घालून हत्या करण्यात आली. ही टार्गेटेड किलिंग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मृत तरुणी ब्रॅम्पटन येथील पवनप्रीत कौर आहे.

ओंटारियो प्रांतातील मिसिसागा शहरात शनिवारी रात्री एका अज्ञान हल्लेखोराने तिची गोळी घालून हत्या केली होती. कॅनडातील माध्यमांनुसार, पवनप्रीत कौर हिच्यावर एका गॅस स्टेशनच्या बाहेर रात्री सुमारे १०.३९ वाजता गोळी घालण्यात आली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोराचा कोणताच तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. याआधी कॅनडात मूळ भारतीय अल्पवयीन मुलीचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...