आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
फिलिपाइन्सची रोवेली जबाला दहाव्यांदा आई होणार आहे. ४१ वर्षीय रोवेलीचे नववे बाळ सदैव तिच्या कडेवर असते. कुटुंब नियोजनाची माहिती होईपर्यंत तिला ७ मुले झाली होती. दहाव्या बाळाबाबत तिने विचारही केला नव्हता. फिलिपाइन्समध्ये जगातील सर्वात कठोर लॉकडाऊन लागला होता. रोजच्या वापराच्या वस्तू आणण्यासाठी तेथे एकाच व्यक्तीला घराबाहेर जाण्याची परवानगी होती.
युनिव्हर्सिटी ऑफ द फिलिपाइन्स पॉप्युलेशन इन्स्टिट्यूट व युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या अंदाजानुसार, लॉकडाऊनमुळे फिलिपाइन्समध्ये पुढील वर्षी सुमारे २ लाख १४ हजार अनियोजित बाळांचा जन्म होईल. ते सर्व आधीपासूनच बेबी फॅक्टरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या रुग्णालयांत जन्मतील. रुग्णालयांत दरवर्षी १७ लाख बाळांचा जन्म होतो. सध्या रुग्णालयांत २ बेड जोडून ४, प्रसंगी ६-७ महिलांना ठेवावे लागते. डॉ. डायना साजिपे म्हणाल्या, रुग्णालयांत जागाच नाही. पुढील वर्षी काय होईल हे देवच जाणो! तथापि फिलिपाइन्सच्या वाढत्या लोकसंख्येमागे फक्त कोरोना हेच कारण नाही. तेथे आधीच लोकसंख्या वाढीची समस्या आहे. २०१५ च्या डेटानुसार, राजधानी मनिलात दर चौरस किमी क्षेत्रात ७० हजारांवर लोग राहतात. लोकसंख्येच्या भस्मासुराचा परिणाम ट्रॅफिक जॅमसह तुरुंगांपर्यंत दिसतो. तुरुंगात क्षमतेपेक्षा ३००% अधिक कैदी आहेत. सरकारने लोकसंख्या वाढीला आळा घालण्याचे खूप प्रयत्न केले आहेत. १९६० पासून सुरू असलेल्या या प्रयत्नांना काही यशही आले आहे. १९६९ मध्ये ६.४ जन्मदर होता. तो २०२० मध्ये २.७५ पर्यंत आला आहे. मात्र लोकसंख्या ३.५ कोटींवरून तीन पटींनी वाढून ११ कोटी झाली आहे. तथापि, ती थायलंडच्या तुलनेत खूप कमी आहे. संयुक्त राष्ट्रानुसार, थायलंडमध्ये १९६० मध्ये जन्मदर ५.८ होता, तो २०२० मध्ये १.५ झाला. थायलंडचा गरिबी दर १०% आहे, तर फिलिपाइन्सचा १७% इतका. भारताशी तुलना केल्यास २०१७ च्या आकडेवारीनुसार येथे जन्मदर २.२४ आहे.
गर्भनिरोधक साधनांचा वापर मान्यतेविरुद्ध, ५० वर्षांत लोकसंख्या तिप्पट
फिलिपाइन्स व थायलंडमध्ये अंतर कशामुळे? फिलिपाइन्सवर कॅथलिक चर्चचा प्रभाव आहे. ते गर्भनिरोधक साधनांच्या वापराला विरोध करतात. तरीही राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांच्या सरकारने लैंगिक शिक्षण व गर्भनिरोधक साधनांबाबत जागरूकता केली आहे. मात्र, या सर्व प्रयत्नांवर कोरोनाने पाणी फेरले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.