आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइराकमध्ये, 22 वर्षीय यूट्यूब स्टार टिबा अल-अलीची 31 जानेवारी रोजी तिच्या वडिलांनी हत्या केली होती. तेव्हापासून देशभरात संतापाचे वातावरण आहे. खरे तर इराकमध्ये ऑनर किलिंगच्या घटना वाढत आहेत. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते साद मान यांनीही या हत्येबाबत ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
साद मान यांनी शुक्रवारी ट्विट करून ही घटना दक्षिणेकडील दिवानिया प्रांतातील असल्याची माहिती दिली. टिबा तुर्कीत राहत होती. काही दिवसांपूर्वीच ती इराकमध्ये परतली होती. टीबा आणि तिच्या वडीलात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. काही कॉल रेकॉर्डिंगवरून असे दिसून आले की, टीबा तुर्कीमध्ये एकटीच राहत होती, ज्यामुळे तिच्या वडिलांची निराशा झाली. तथापि, यूट्यूब व्हिडिओ सूचित करतात की, टीबा तिच्या नवऱ्यासोबत मोहम्मद हाजाजी सोबत तुर्कीत राहत होती.
वाद मिटला नाही, अखेर तिचा गळा घोटला
पोलिसांनी वडील आणि मुलीतील वाद मिटवण्याचाही प्रयत्न केला, त्यानंतर एका दिवसानंतर टीबाची हत्या करण्यात आली. स्थानिक मीडियानुसार, टिबा तिच्या खोलीत झोपली होती. तेव्हा तिच्या वडिलांनी तिची गळा दाबून हत्या केली. यानंतर वडीलांनी स्वतः पोलिसात जाऊन आपला गुन्हा कबूल केला. या घटनेचे सर्वानांच धक्का बसला आहे.
भावाने लैंगिक शोषण केले, म्हणून घर सोडले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टिबा 2017 मध्ये आपल्या कुटुंबासह तुर्कीला गेली होती. त्यानंतर तिने इराकमध्ये परतण्यास नकार दिला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या टिबाच्या काही कथित रेकॉर्डिंगवरून असे सूचित होते की, टिबावर तिच्या भावाने लैंगिक शोषण केल्याने तिने घर सोडले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.