आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारणे दाखवा नोटीस:विवो इंडियात 2,217 कोटींची कस्टम ड्यूटीची चोरी पकडली

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डीआरआयने विवो मोबाइल इंडिया प्रा. लि. या स्मार्टफोन निर्मात्या कंपनीशी संबंधित तपासात २,२१७ कोटी रुपयांची कस्टम ड्यूटी चोरी पकडली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी विवो इंडियाच्या कारखाना परिसरात छापा टाकला होता. त्यात मोबाइल फोन मॅन्युफॅक्चरिंगसाठी आयात केलेल्या काही वस्तूंच्या तपशिलासंदर्भात जाणूबुजून चुकीचे स्पष्टीकरण दिल्याच्या दिशेने संकेत करणारे पुरावे मिळाले होते. डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या मते, विवो इंडियाने २,२१७ कोटी रुपयांच्या शुल्क सवलतीचा चुकीच्या पद्धतीने फायदा मिळवला. चौकशीच्या आधारावर डीआरआयने विवो इंडियाला कारणे दाखवा नोटीस जारी करून कस्टम कायदा, १९६२ च्या अंतर्गत २,२१७ कोटी रुपयांच्या कस्टम ड्यूटीची मागणी केली आहे. विवो इंडियाने आपले वेगवेगळे कर चुकवण्यासाठी स्वेच्छेने ६० कोटी रुपये जमा केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...