आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 23% Of Foreign Companies Start Counting Packs, 538 Foreign Companies Shift From China To Singapore, Vietnam And Hong Kong

चीन लॉकडाउनमध्येच!:23 टक्के विदेशी कंपन्यांनी ‘पॅकअप’ची गिनती सुरू केली, 538 विदेशी कंपन्या चीनहून इतर देशांत शिफ्ट

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमधील अमेरिकी आणि युरोपीय चेंबर ऑफ काॅमर्सच्या मते गेल्या दोन महिन्यांत ५३८ विदेशी कंपन्या चीनमधून इतर देशांत शिफ्ट झाल्या आहेत. यापैकी बहुतांश दक्षिण पूर्व आशियातील देश म्हणजे सिंगापूर, व्हिएतनाम आणि हाँगकाँगला गेल्या. चीनमध्ये लॉकडाऊन आणि जिनपिंग सरकारच्या फर्मानांमुळे या दक्षिण पूर्व देशांनी चीनहून शिफ्ट होणाऱ्या या कंपन्यांना कर आणि इतर प्रकारच्या सवलती दिल्या आहेत. युरोपीय चेंबर ऑफ काॅमर्सचे स्टीव्ह ल्यूक यांच्या मते भारत आणि बांगलादेशातही शक्यता पडताळल्या जात आहेत.

राष्ट्रपती शी िजनपिंग यांचे झीरो कोविड धोरण आता चीनसाठीच मारक ठरत आहे. दोन महिन्यांपासून चीनमधील २६ शहरांतील सुमारे ४० कोटी जनता अंशत: किंवा पूर्ण लॉकडाऊनमध्ये आहे. ते लवकर उठवण्याचे कोणतेही संकेत नसल्याने चीनमध्ये नोंदणीकृत सुमारे साडेदहा लाख विदेशी कंपन्या आणि गुंतवणूकदारांपैकी २३ टक्क्यांनी म्हणजे २.४१ लाखांनी गाशा गुंडाळण्यासाठी काउंटडाउन सुरू केले आहे.म्हणजे या कंपन्या चीनमधील आपला व्यवहार गुंडाळणार आहेत. लॉकडाउन सोसत असलेल्या चीनची आर्थिक राजधानी शांघायमध्येच सुमारे ७० हजार विदेशी गुंतवणुकीवर आधारित कंपन्या आहेत. यात सुमारे निम्म्यावर कंपन्यांनी आपला कारभार गुंडाळला आहे. दोन महिन्यांपासून सर्वच विदेशी कंपन्यांना टाळे लागलेले आहेत. राजधानी बीजिंगमध्येही सुमारे ३५ हजार विदेशी कंपन्या असून यापैकी जवळपास १० हजार विदेशी कंपन्यांनी पूर्णपणे गाशा गुंडाळला आहे. चीनची पुरवठा साखळी लॉकडाऊनमुळे पूर्णत: बाधित झाली आहे. जागतिक बँकेनेही चीनचा आर्थिक विकास दराचा अंदाज ऑक्टोबर २०२१ च्या ५.५ टक्क्यांवरून एप्रिल २०२२ मध्ये घटवून ४.४ केला आहे.

अॅपलला ६२ हजार कोटींचे नुकसान, आता भारतात बनतील आयफोन : रिपोर्ट
चीनमध्ये लॉकडाउनमुळे अॅपलला ६२ हजार

कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एका अहवालानुसार अॅपल चीनवर उत्पादन अवलंबित्व नको म्हणून आता भारतात आयफोन बनवू शकते. दरम्यान क्रिसिलच्या अहवालानुसार, लॉकडाउनमुळे भारताचे चीनसोबतचे व्यापार संतुलन मागील वर्षीच्या तुलनेत वाढले आहे. २०२१ मध्ये भारताचे चीनसोबतचे व्यापार असंतुलनजेथे ३.४१ लाख कोटींचे होते, जे २०२२ मध्ये आतापर्यंत वाढून ५.४६ लाख कोटी रुपये होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

जिनपिंगना ऑक्टोबरमधील आपल्या निवडीची जास्त काळजी
चीनची आर्थिक स्थिती खालावली असतानाही राष्ट्रपती जिनपिंग लॉकडाउनचा निर्णय यासाठी घेत आहेत की, त्यांना ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या अधिवेशनात आपली निवड शांततेच्या मार्गाने होण्याची जास्त काळजी आहे. लॉकडाउनमुळे आर्थिक स्थिती खालावत असल्याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. लोक घरांत कैद आहेत. बेरोजगारीचा दर ५ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. जिनपिंग यांना वाटते की, कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढू नयेत. यावरून त्यांना लोकांचा रोष झेलायचा नाही. शांघायमध्ये सोमवारीही ८ हजार नवे रुग्ण सापडले.

बातम्या आणखी आहेत...