आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियात कडक नियमांची प्रचिती:सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे, ओळखपत्र न बाळगणाऱ्या मुलांवर 2.4 लाखांचा दंड

मेलबर्न6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियाने काही महिन्यांपूर्वी जगासाठी आपले दारे खुली केली. परंतु त्याआधी सरकारने कोरोना महामारीचा विचार करून दोन वर्षे कडक नियम लागू केले होते. नियमांचा फटका लहान मुलांनादेखील बसला. यावरून ऑस्ट्रेलियातील कडक नियमांची प्रचिती येते. न्यू साऊथ वेल्समध्ये तर तीन हजार मुलांवर दंड ठोठावण्यात आला.

अलीकडेच जाहीर झालेल्या अहवालानुसार नियमांचे उल्लंघन केल्यावरून हा दंड वसूल करण्यात आला. लहान मुलांनी मास्क न वापरणे, आयसोलेशनचे पूर्ण पालन न करणे, घरात किंवा बाहेर जास्त लोक एकत्र आल्याच्या कारणाने विविध दंड लावण्यात आले. १० ते १७ वयोगटातील मुलांचा यात समावेश आहे. दंडाची रक्कम सुमारे ८० हजार रुपये ते २.४ लाख रुपये आहे. अशा प्रकारे दंड लावणे म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमांची पायमल्ली असल्याचे कायदेतज्ज्ञांनी म्हटले.

सेवा देऊन दंडात घट शक्य, तज्ञ म्हणाले- हे क्रौर्य
राज्याच्या महसूल विभागाने दंडाच्या वसुलीसाठी व्यवस्था करण्यात आल्याच्या दाव्याची पुष्टी करण्यात आली आहे. वास्तविक डब्ल्यूडीओच्या एका नियमानुसार १८ वर्षांहून कमी वयाची मुले सार्वजनिक काम, समुपदेशन कोर्स, उपचारात मदत इत्यादी करत असल्यास त्यांचा दंड कमी होऊ शकतो. न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील वरिष्ठ प्रोफेसर डॉ. नेओम पेलेग म्हणाले, १० वर्षांपर्यंतच्या मुलांना दंड लावण्याचा सल्ला देणे क्रूरपणा आहे. बाल हक्क कायद्याचे उल्लंघन आहे.

बातम्या आणखी आहेत...