आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका:50 वर्षांहून जास्त वयाचे 2.6 कोटी एकटे राहतात, भविष्यातील देखभालीची चिंता भेडसावतेय

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे जवळपास २.६० कोटी लोक एकटे राहतात. त्यांच्यासोबत ना कुटुंबातील सदस्य आहे ना मित्र. २००० मध्ये झालेल्या पाहणीत समोर आले होते की, ५० वर्षांवरील १.५ कोटी लोक एकटे राहतात.

आधीच्या तुलनेत आता घटस्फोटित, विधवा-विधूर आणि लग्न न करणाऱ्या लोकांची संख्याही वाढली आहे. यामुळे एकटे राहणाऱ्या लोकांची संख्या वेगाने वाढली आहे. ही वाढती संख्या अमेरिकेसाठी चिंतेचा विषय झाली आहे. नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार, एकटे राहणारे ज्येष्ठ शारीरिक व मानसिकदृष्ट्या त्रस्त राहतात. लग्न आणि अपत्य प्राप्ती करणाऱ्या ज्येष्ठांना आपल्या भविष्याची चिंता सतावत आहे. ५२ वर्षीय केजे माइल्स म्हणाले, मनासारखे जगण्यासाठी लग्न केले नाही. मात्र, आता वय वाढल्याने भीती वाटते. एकटे राहणाऱ्या लोकांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. महिलांनी कार्यक्षेत्रात पुढे जाणे, घर खरेदी आणि वित्तीय स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी एकटे राहण्याचा निर्णय घेतला. ५५ वर्षीय प्राध्यापक डोन्ना सेलमान म्हणाल्या, तसे केल्याने त्यांना आर्थिक आणि भावनात्मक स्वातंत्र्य मिळाले. हे आईला व अन्य नातेवाइकांना मिळाले नव्हते. एकटे राहून घर सांभाळण्याचे आव्हान मोठे आहे. पावसात छत गळते, मात्र दुरुस्ती होऊ शकत नाही.

मोठ्या घरांत एकटे राहणाऱ्यांत बहुतांश कृष्णवर्णीय ज्येष्ठांना लहान घरांत शिफ्ट व्हावे वाटते. मात्र, देशात लहान घरे महागडी झाली आहेत. परिणामी, त्यांना मोठ्या घरांत राहावे लागते. अनेक जण लहान घर खरेदी करू शकले नाहीत. मोठ्या घरांत एकटे राहणाऱ्यांत कृष्णवर्णीयांची संख्या जास्त आहे.

बातम्या आणखी आहेत...