आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमालियात 26/11 सारखा हल्ला:​​​​​​​मोगादिशुच्या हयात हॉटेलामध्ये शिरले 'अल-शबाब'चे अतिरेकी; 8 ठार, अनेक जखमी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमालियाची राजधानी मोगादिशुमध्ये मुंबईवरील 26/11 सारखा अतिरेकी हल्ला झाला आहे. 'अल कायदा'शी संबंधित 'अल-शबाब' नामक अतिरेकी संघटेनेचे काही सशस्त्र अतिरेकी मोगादिशुच्या हॉटेल हयातमध्ये शिरलेत. त्यांनी अनेक जणांना ओलीस धरल्याचे वृत्त आहे. यावेळी झालेल्या झालेल्या चकमकीत जवळपास 8 जण ठार झाले असून, 9 हून अधिकजण जखमी झालेत.

एएफपीच्या वृत्तानुसार, अतिरेकी हॉटेलमध्ये लपले असून, त्यांची सुरक्षा जवानांशी चकमक सुरू आहे. हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये शिरण्यापूर्वी एक मोठा बॉम्बस्फोट केल्याचीही माहिती आहे.

2 सुरक्षा अधिकारी जखमी

दुसरीकडे, पोलिस अधिकारी हसन दाहीर यांनी सांगितले की, सुरक्षा दल व जिहादी संघटनेच्या बंडखोरांत झालेल्या चकमकीत मोगादिशुचे गुप्तहेर विभाग प्रमुख मुहीदीन मोहम्मदसह 2 सुरक्षा अधिकारी जखमी झालेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पहिल्या स्फोटानंतर काही मिनिटांतच दुसरा मोठा स्फोट झाला. त्यात सुरक्षा दलाचे काही सदस्य व नागरीक जखमी झाले. सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे.

यापूर्वीही झालेत हल्ले

अल-शबाब अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अल शबाबच्या हल्लेखोरांचा एक समुह मोगादिशुच्या हॉटेल हयातमध्ये शिरला आहे. यावेळी ते भयंकर गोळीबार करत आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे सोमालियातील हा काही पहिला अतिरेकी हल्ला नाही. यापूर्वीही या देशात असे अनेक हल्ले झालेत. त्यात शेकडो जणांचा बळी गेला आहे.

कोण आहे अल-शबाब?

अल शबाब एक अतिरेकी संघटना आहे. या संघटनेचा मुख्य उद्देश 2017 मध्ये सोमालियात स्थापन झालेले सरकार उखडून टाकण्याचा आहे. अल शबाबची स्थापना 2006 मध्ये झाली. ही संघटना सौदी अरेबियाच्या वहाबी इस्लामला मानते.

मोगादिशु शहर यूनियन ऑफ इस्लामिक कोर्ट्सच्या ताब्यात होते. ही शरिया न्यायालयांची एक संघटना होती. शरीफ शेख अहमद त्याचा म्होरक्या होता. 2006 मध्ये इथिओपियाच्या लष्कराने या सघटनेचा पराभव केला. त्यानंतर अल शबाबचा उदय झाला. अल शबाब यूनियन ऑफ इस्लामिक कोर्ट्सची एक कट्टरपंथी शाखा आहे.

अल शबाबमध्ये जगातील काही सर्वात धोकादायक अतिरेक्यांचा समावेश आहे. हे अतिरेकी आत्मघातकी हल्ल्यांसाठी नेहमीच तयार असतात.
अल शबाबमध्ये जगातील काही सर्वात धोकादायक अतिरेक्यांचा समावेश आहे. हे अतिरेकी आत्मघातकी हल्ल्यांसाठी नेहमीच तयार असतात.

अल-शबाबचे मोठे हल्ले

  • 2017 मध्ये मोगादिशु शहरात एक स्फोट झाला. त्यात 275 जण ठार झाले होते.
  • अल-शबाब अतिरेक्यांनी 2016 मध्ये केन्याच्या लष्करी तळावर हल्ला केला होता. त्यातही 180 सैनक शहीद झाले होते.
  • 2015 मध्ये केन्याच्या विद्यापीठावर अतिरेकी झाला. त्यात 148 विद्यार्थ्यांचा बळी गेला होता.
बातम्या आणखी आहेत...