आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • 26 11 Mastermind Lakhvi Arrested In Pakistan, Accused Of Providing Financial Logistics To Terrorists

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इस्लामाबाद:26/11 चा मास्टरमाइंड लखवी पाकमध्ये अटकेत, अतिरेक्यांना आर्थिक रसद पुरवल्याचा आरोप

इस्लामाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड व लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या झकी-उर-रहमान लखवीला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. मुंबईवरील आत्मघाती हल्ल्यानंतर त्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय अतिरेकी घोषित केले होते.

वृत्तांनुसार, पाकिस्तानच्या संस्थांनी लाहोरमध्ये लखवीच्या मुसक्या बांधल्या. आपल्या संस्थांच्या दवाखान्यांच्या नावावर मिळालेल्या रकमेचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याने २६ नोव्हेंबर २००८ राेजी पाकिस्तानी लष्कर व गुप्तचर संस्थांशी संधान साधून १० आत्मघाती अतिरेक्यांना मुंबईवर हल्ल्यासाठी पाठवले. त्यांनी मुंबईत विविध ठिकाणी केलेल्या हल्ल्यांत १५५ वर नागरिकांचा मृत्यू झाला. आमिर कसाब या अतिरेक्याला जिवंत पकडण्यात आले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser