आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये गुरुद्वाऱ्याला मशीद सांगत ताबा मिळवण्याचा प्रयत्न:मुस्लिम कट्टरवाद्यांनी लाहोरच्या 277 वर्षे जुन्या गुरुद्वाऱ्याला ठोकले कुलूप

लाहोर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानमध्ये सरकारी संरक्षणात अल्पसंख्याकांच्या धार्मिक अधिकारांच्या उल्लंघनाचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. शाहबाज सरकारच्या चिथावणीनंतर मुस्लिम कट्टरवाद्यांनी इव्हॅक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डासोबत (ईटीपीबी) मिळून लाहोरच्या सुमारे २७७ वर्षे जुन्या ऐतिहासिक शहीद भाई तारूसिंह गुरुद्वाऱ्याला कुलूप ठोकले आहे. पवित्र ऐतिहासिक गुरुद्वाऱ्याला मशीद सांगत मौलाना त्यावर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत..

पाकिस्तानी शिखांमध्ये या कारवाईबाबत रोष आहे. त्यांचे म्हणणे आहे की, गुरुग्रंथसाहिबचे पठण थांबले आहे. यात अनेक भाविक सहभागी व्हायचे. गेल्या काही वर्षांपासून कट्टरवाद्यांकडून गुरुद्वारा बंद करण्याच्या धमक्या येत होत्या. त्यांनी ईटीपीबीसोबत मिळून टाळे ठोकले आहे.

लाहोर येथे १९४७ मध्ये २० लाख शीख बांधव होते, आता केवळ २० हजार आहेत. पाक शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीनुसार, १९४७ मध्ये इथे २० लाख शीख होते. आता २० हजार आहेत. येथील १६० ऐतिहासिक गुरुद्वाऱ्यांपैकी २० च्या संचालनाची परवानगी आहे.

गुरुद्वाऱ्याच्या जागी १७४५ मध्ये मुघलांशी लढत भाई तारूसिंह शहीद झाले होते. १७४७ मध्ये इथे गुरुद्वाऱ्याची निर्मिती झाली. आता मुस्लिम संघटनांच्या दबावात पाकिस्तान सरकारने गुरुद्वाऱ्याला कुलूप ठोकण्यास मंजुरी दिली आहे.

हिंदूही धोक्यात
ऑल पाकिस्तान हिंदू राइट मूव्हमेंटनुसार फाळणीच्या वेळी ४२८० पैकी आता ३८० मंदिरे शिल्लक आहेत. येथील ३९०० मंदिरे तोडली आहेत.

बातम्या आणखी आहेत...