आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडतर प्रवास:अमेरिकेत 5 दिवसांत 2800 उड्डाणे रद्द; विमान कर्मचाऱ्यांचा तुटवडा

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाकाळानंतर अमेरिकन नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडले. परंतु त्यांचा विमानप्रवास प्रचंड खडतर झाला आहे. देशात २८ मे ते १ जूनपर्यंत २८०० विमान उड्डाणे रद्द झाली. विमान कर्मचाऱ्यांचा तुटवडा हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. न्यूयॉर्क, वाॅशिंग्टन, टेक्सास, आेहियो, मिसिसिपी, डलासमध्ये लाखाे प्रवासी विमानतळावर अडकून पडले आहेत. वास्तविक कोरोनाकाळात अमेरिकेतील प्रमुख विमान कंपन्यांनी आपल्या ५५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. ग्राउंड स्टाफमध्ये तर ६० टक्क्यांवर कपात झाली आहे. परंतु आता प्रवासी संख्या वाढली तर विमान कर्मचाऱ्यांनी नवीन भरती मात्र सुरू केलेली नाही. फ्लाइट अवेअर संकेतस्थळानुसार कोरोनाकाळाच्या आधी दररोज सुमारे ३० हजारांहून जास्त उड्डाणे होती. आता ही आकडेवारी २८ हजारांवर आहे. काही विमान कर्मचारी आजारी असल्याचे सांगण्यात आले.

१२ लाख अमेरिकींची योजना बारगळली; उड्डाणांची कमतरता
अमेरिकेत ३० मे रोजी स्मृतिदिनासोबत उन्हाळी सुट्या सुरू होतात. दक्षिणेकडील राज्यांतील आकडेवारी पाहता सुमारे १२ लाख अमेरिकन नागरिकांनी पर्यटनाची योजना आखली आहे. एवढेच नव्हे तर विमान तिकिटेही खरेदी केली. परंतु उड्डाणांची कमतरता असल्यामुळे त्यांच्या योजनेवर संकट दिसते. एअरलाइन्स असोसिएशनने आरटीपीसीआर चाचणीची सक्तीही रद्द करण्याची मागणी केली.

ब्रिटन : १५५ उड्डाणे रद्द, प्रवासी रिकाम्या विमानात जाऊन बसले..
ब्रिटनमध्ये जवळपास सर्वच विमानतळांवर समस्या होत्या. हिथ्रो व गॅटिवक आंतरराष्ट्रीय िवमानतळावर सुमारे १५५ उड्डाणे रद्द करावी लागली. ही संख्या एकाच दिवसातील आहे. विमानतळावर आणि बाहेरही प्रवाशांच्या रांगा दिसतात. मँचेस्टर विमानतळावर या गदारोळात एका रिकाम्या विमानात प्रवासी लगबगीने जाऊन बसले होते. ते मुक्कामी होते. अखेर पाेलिसांना बाेलावून प्रवाशांना खाली उतरवावे लागले.

जगात २०१९ मध्ये ४.५ अब्ज प्रवासी, ४२ लाख उड्डाणे -जगभरात २०२० मध्ये १.८ प्रवाशांचा २४ लाख उड्डाणांतून प्रवास. -जगात २०२१ मध्ये २.५ अब्ज प्रवाशांचा ३० लाख उड्डाणांतून प्रवास. -२०२० मध्ये जगात १० सर्वात व्यग्र विमानतळांत ६ चीन व ४ अमेरिकेचे

बातम्या आणखी आहेत...