आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्लंड:3 देश- इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीत सक्ती आणखी वाढली; औषधी-धान्याचा तुटवडा, फ्रान्स, जर्मनीत लॉकडाऊन वाढेल

लंडनएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन झाले कोरोनामुक्त, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला

कच्च्या मालाची कमतरता व औद्योगिक हालचाली ठप्प झाल्याने आता आवश्यक वस्तूंचा पुरवठा बाधित होऊ शकतो, असा इशारा औद्योगिक संघटनेने दिला आहे. विमानतळ व बंदरे बंद आहेत. आयातही पूर्णपणे बंद आहे. यामुळे औषधे व खाद्यपदार्थांच्या वस्तूंचा तुटवडा भासू शकतो. देशातील ४६ टक्के ट्रक रस्त्याच्या बाजूला उभे आहेत. सध्या ट्रकांमधूनच देशभरात औषधे, खाद्यपदार्थांचा व आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. मात्र संकट वाढण्याची चिन्हे आहेत. कारण वाहतूक कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे. कंपन्या बंद झाल्यास याचा इंग्लंडमधील वाहतुकीवर गंभीर परिणाम होईल. काही फर्म कायमस्वरूपी बाहेर पडतील अशी शक्यता आहे.  इंग्लंडमध्ये सोमवारी ७१३ मृत्यू झाले. आतापर्यंत १०,६१२ मृत्यू झाले आहेत.

जर्मनी : लॉकडाऊनच्या बाजूने ४४%, विरोधात ८%

जर्मनीमध्ये ८ मार्चपासून लॉकडाऊन आहे. येथे युगव रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणानुसार ४४ टक्के लोक लॉकडाऊन १९ एप्रिलपासून पुढे वाढवण्याच्या बाजूने आहेत, तर निर्बंध आणखी कठोर करण्यात यावेत, असे १२ टक्के लोकांचे मत आहे. केवळ ३२ टक्के लोक निर्बंधांमध्ये सूट देण्याच्या बाजूने होते. तसेच लॉकडाऊन वाढवण्याच्या विरोधात ८ टक्के लोक आहेत. १३ एप्रिल २०२० पर्यंत जर्मनीत कोविड-१९ ची १.२७ लाख प्रकरणे समोर आली आहेत. ३००० हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. दर आठवड्यात तीन लाख टेस्ट केल्या जात आहेत.

फ्रान्स : राष्ट्राध्यक्षांनी दिले लॉकडाऊन वाढीचे संकेत

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी सोमवारी इशारा दिला की, फ्रान्समध्ये कोरोना विषाणूशी सुरू असलेले युद्ध अजून काही आठवडे चालू शकते. या प्रकारे त्यांनी लॉकडाऊन वाढीचे संकेत दिलेे आहेत. येथे १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची डेडलाइन होती. मॅक्रॉन सोमवारी रात्री देशाला संबोधित करतील. सूत्रांनुसार, ते या वेळी लॉकडाऊन मेपर्यंत वाढवण्याची घोषणा करतील. फ्रान्समध्ये आतापर्यंत कोरोनामुळे १४,३९३ मृत्यू झाले आहेत. १,३२,५९१ लोक संसर्गित आहेत.

रशिया : २५५० नवीन प्रकरणे, एका दिवसात सर्वाधिक

गेल्या २४ तासांत रशियामध्ये २५५० नवीन प्रकरणे समोर आली आहेत. हा एका दिवसात कोरोना संसर्ग झाल्याचा रशियातील सर्वात मोठा आकडा आहे. देशभरात १८,३२८ संसर्गित आहेत. महामारीमुळे रशियात आतापर्यंत १४८ मृत्यू झाले आहेत. यापैकी दोन तृतीयांश प्रकरणे मॉस्कोतील आहेत. येथील एक प्रमुख रुग्णालय देशातील व्हीआयपींनी भरले आहे. रशियानेही लॉकडाऊन वाढीचे संकेत दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...