आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉस्को/लंडन:युरोपच्या 3 देशांनी एअरस्पेस बंद केले, रशियन परराष्ट्रमंत्र्यांचा दौरा रद्द

मॉस्को/लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनवरील हल्ल्याचा परिणाम रशियाच्या परराष्ट्र धोरणावर होत आहे. याचेच उदाहरण सोमवारी समोर आले. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांना या आठवड्यातील सर्बियाचा मंगळवार, बुधवारचा नियोजित दौरा रद्द करावा लागला. कारण सर्बियाच्या तीन शेजारी राष्ट्रांनी आपल्या हवाई सीमा (एअसरस्पेस) रशियासाठी बंद केल्या आहेत. वृत्तानुसार बल्गेरिया, उत्तर मॅसेडोनिया आणि माँटेनिग्रोने लावरोव्हच्या विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. यास रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जखारोव्हा यांनी दुजोरा दिला आहे. रशियन शिष्टमंडळ बेलग्रेडमध्ये चर्चा करणार होते. तथापि, युद्ध सुरू असतानाही सर्बियाने अद्याप रशियावर निर्बंध लावले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...