आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोकियो:चंद्रावर सहलीसाठी आले 3 लाख अर्ज, भारत पहिल्या क्रमांकावर

टोकियोएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एलन मस्कची कंपनी स्पेस एक्स फ्लाइटमधून मोफत मून ट्रीप करणाऱ्या जपानी अब्जपती युसाकू मेजावाला आतापर्यंत ३ लाख अर्ज मिळाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर सर्वाधिक अर्ज पाठवणाऱ्या देशाची यादी टाकली, त्यात भारत पहिल्या क्रमांकवर आहे. मेजावाने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, ते ८ लोकांचा शोध घेत आहे. त्यांना ते मोफत चंद्रावर घेऊन जातील. मेजावाने संागितले, त्यांना २३७ देश आणि भागातून अर्ज मिळाले. भारतानंतर सर्वात जास्त अर्ज अमेरिका, जापान, फ्रान्स आणि ब्रिटेनवरुन आले आहेत.

जपानच्या फॅशन टायकून युसाकूने यापूर्वी ट्रीपसाठी अर्ज आणि अटींची लिंक प्रसिद्ध केली होती. ते म्हणाले होते, अर्जदारांना दोन निकष पाळावे लागतील. ते जे काही काम करत असतील ते समाज आणि इतर लोकांना मदत करू शकतील अशा मार्गाने पुढे नेणे गरजेचे आहे.

शिवाय त्यांना चालक दलातील सदस्यांनादेखील पाठिंबा द्यावा लागेल, ज्यांची इच्छा सारखी असेल. खरंतर, २०१८ मध्ये युसाकूने घोषणा केली होती की, स्पेसएक्सचे तिकीट खरेदी करणारे ते पहिले खासगी प्रवासी आहेत. परंतु, त्यांनी जागांसाठी किती पैसे दिले हे सांगितले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...