आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजकाल लोकांची एकाग्रता कमी होत चालली आहे, असे अमेरिकन लेखक योहानन हारी यांनी म्हटले आहे. कोणतेही काम करताना त्यावर एकाग्र होण्यासाठी द्यावा लागणारा वेळ आता दिला जात नाही. अर्थात अटेन्शन टाइममध्ये मोठी घट झाली आहे. मेंदूवर तंत्रज्ञानाचा दुष्परिणाम होत असल्याचे दिसू लागले आहे. अमेरिकेत कोणत्याही कर्मचाऱ्याला एखादे टास्क दिल्यानंतर तो तीन मिनिटांच्या वर त्यावर एकाग्र राहू शकत नाही. मोबाइल मात्र दिवसातून सुमारे दोन हजार वेळा चेक केला जातो. लोक दिवसातील सरासरी तीन तास मोबाइल न्याहाळण्यात घालवतात. त्याला हारी ‘अटेन्शन क्रायसिस’ असे संबोधतात. हायटेक कंपन्याच्या बिझनेस मॉडेलमध्ये अटेन्शनवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. त्यातूनच ते मोठ्या प्रमाणात कमाई करतात.
त्यातूनच एकाग्रतेत घट होत दिसून येते. त्यामागे मुख्य कारण कार्बोहायड्रेट अन्न व झोप कमी घेणे हे ठरते. या गोष्टींचा एकाग्रतेवर प्रतिकूल परिणाम होतो. एकाग्रता वाढवण्यासाठी हारी स्वत:चे उदाहरण देतात. हारी तीन महिने इंटरनेटपासून दूर राहिले आणि रोज आठ तासांची झोप घेतली. लोकांमध्ये वाचनाची सवयही कमी होत चालली आहे. मोबाइल व संगणकाच्या पडद्यावरील वाचनातून एकाग्रतेमध्ये वाढ होत नाही. परंतु पुस्तक वाचनातून एकाग्रतेत वाढ झाल्याचे जाणवते. अशा एकाग्रतेचा मेंदूलादेखील फायदा होतो. कोरोनाच्या काळात अनेक गोष्टींची बंधने आल्यानंतर लोकांच्या सवयीतही बदल झाले. त्याचबरोबर क्षमतेवरही परिणाम झाला.
योहानन हारी म्हणाले, कोरोनाकाळात जोखमीबद्दल आणि जोखमीची शक्यता लक्षात घेण्यावर विचार केंद्रित होते. त्याचाही आपल्या एकाग्रतेवर परिणाम झाला आहे. एकाग्रतेला परत आणण्यासाठी फोर डे वीकची संकल्पना लाभदायी ठरू शकते. सोबतच लहान मुलांना फ्री प्लेसाठी सोडून दिले पाहिजे. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होऊ शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.