आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापालकांच्या गुणसूत्रांशी संबंधित आजारापासून बाळाचा बचाव करण्यासाठी २०१६ मध्ये सुरू झालेल्या वादग्रस्त ३ पॅरेंट बेबी तंत्रज्ञानही पूर्णपणे सुरक्षित नाही. अभ्यासातील निष्कर्षानुसार, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जन्मलेल्या बाळांमध्ये काळानुरूप आईच्या मायटोकोन्ड्रियल डीएनएचे(एमटीडीएनए) प्रमाण वाढते,ज्याचा आजारांपासून बचाव करण्याच्या तंत्रज्ञानात वापर केला आहे. अशा पद्धतीने गंभीर आजारांचा धोका कायम राहतो. ब्रिटन, ग्रीस आणि युक्रेनमध्ये या तंत्रज्ञानाद्वारे उपचार देणारे क्लिनिक सुरू केले आहे. ऑस्ट्रेलियात गेल्या वर्षी या तंत्रज्ञानास मंजुरी दिली. मात्र, अमेरिकेत यावर बंदी आहे. एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यूनुसार, हे तंत्रज्ञान नेहमी यशस्वी राहावे,असे नाही. त्याने अशी दोन प्रकरणे सादर केली आहेत जे या तंत्रज्ञानावर प्रश्न उपस्थित करतात. दोन्ही प्रकरणांत मुलात आईच्या मायटोकोन्ड्रियल डीएनएचे(एमटीडीएनए) प्रमाण काळानुरूप वाढते. एकात सुमारे ५०% आणि दुसऱ्यात ७२% पर्यंत पोहोचले. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, काळानुसार या तंत्रज्ञानाद्वारे जन्मलेल्या पाचपैकी एक बाळामध्ये आईच्या मायटोकोन्ड्रियल जीन्सचा स्तर वाढू शकतो. अशात जीन्स आजारी असतील तर मूल घातक आजाराला बळी पडू शकतात. या निष्कर्षानंतर अनेक क्लिनिकनी एमटीडीएनए आजारांसाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि अभ्यासावर बंदी घातली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या रिप्रोडक्टिव्ह बायलॉजिस्ट डागन वेल्स यांच्यानुसार, प्रयोगातून दिसते की, हे तंत्रज्ञान कायमस्वरूपी मायटोकोन्ड्रियल आजार रोखेलच असे नाही.
काय आहे पॅरेटिंग बेबी तंत्रज्ञान किंवा एमआरटी एमटीडीएनए आईकडून मुलाकडे येते. समस्या ही तेव्हा होते जेव्हा एमटीडीएनएमध्ये आजार निर्माण करणारे म्यूटेशन होते. तेव्हा पालकांचे डीएनए राहतात, मात्र आईऐवजी दात्याचे एमटीडीएनए बाळास दिले जातात. याला मायटोकोंड्रिया रिप्लेसमेंट थेरपी किंवा ३ पॅरेंट बेबी तंत्रज्ञान म्हणतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.