आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्यूस्टनमध्ये 3 जणांची हत्या:हल्लेखोराने प्रथम इमारतीला आग लावली; त्यानंतर बाहेर येणाऱ्यांना एकेक करून गोळ्या घातल्या

टेक्सास3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्लेखोराने याच इमारतीला आग लावली होती. ही मल्टी रूम रेंटिंग फॅसिलिटी असून, त्यात अनेकजण भाड्याने खोली घेऊन राहतात.  - Divya Marathi
हल्लेखोराने याच इमारतीला आग लावली होती. ही मल्टी रूम रेंटिंग फॅसिलिटी असून, त्यात अनेकजण भाड्याने खोली घेऊन राहतात. 

अमेरिकेच्या टेक्सास राज्याच्या ह्यूस्टन शहरातील एका अपार्टमेंटमधून बाहेर काढण्यात आलेल्या एका व्यक्तीने 3 जणांची हत्या केली. या व्यक्तीने प्रथम इमारतीला पेटवून दिले. त्यानंतर बाहेर येणाऱ्या लोकांना त्याने लागोपाठ गोळ्या घातल्या.

हल्लेखोराने 5 जणांवर गोळीबार केला. त्यातील 2 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये 40 ते 60 वर्षांच्या पुरुषांचा समावेश आहे. 2 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस कारवाईत हल्लेखोर ठार

ही घटना स्थानिक प्रमाणवेळेनुसार रविवारी रात्री 1 च्या सुमारास साऊथवेस्ट ह्यूस्टनच्या इंडस्ट्रियल-रेसिडेंशिअल कॉम्प्लेक्समध्ये घडली. अपार्टमेंटमध्ये आग लागल्याचे वृत्त मिळताच पोलिस व अग्निशमन विभागाचे अधिकारी तिथे पोहोचले. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत हल्लेखोरही ठार झाला. पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोर जवळपास 40 वर्षांचा होता. तो या अपार्टमेंटमध्ये प्रदिर्घ काळापासून राहत होता.

अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रॉबिन अहरेन्स यांनी सांगितले की, हल्लेखोराला कर्करोग होता. त्याची नोकरीही गेली होती.
अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रॉबिन अहरेन्स यांनी सांगितले की, हल्लेखोराला कर्करोग होता. त्याची नोकरीही गेली होती.

कर्करोगाचा रुग्ण होता हल्लेखोर

अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रॉबिन अहरेन्स यांनी सांगितले की, हल्लेखोराला कोलोन कँसर होता. त्याची नोकरीही गेली होती. त्याला भाडे देता येत नव्हते. यामुळे त्याला घर खाली करण्याची नोटीस देण्यात आली होती. या वैफल्यातून त्याने हे हत्याकांड घडवले.

रॉबिन म्हणाले की, हल्ल्यावेळी आम्ही आमचे काम करत होतो. आम्हाला वाटले बाहेर फटाके फोडले जात आहेत. सुदैवाने घरातच राहिल्यामुळे आम्ही वाचलो. अन्यथा आमचेही प्राण गेले असते.

डेट्रॉयटमध्येही अज्ञात हल्लेखोराने घेतला तिघांचा बळी

अमेरिकेच्याच डेट्रॉयटमध्ये रविवारी एका हल्लेखोराने 4 जणांवर गोळीबार केला. त्यातील 3 जण ठार झाले. मृत्तांत 2 महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. पोलिसांनी हल्लेखोराला शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. मिडवेस्टर्न सिटी पोलिस प्रमुख जेम्स व्हाइट यांनी सांगितले की, तिन्ही मृतांना वेगवेगळ्या ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या. चौथ्या व्यक्तीने हल्लेखोराला कारच्या मागे लपताना पाहिले. त्याने त्याला थांबण्याचे आवाहन केले असता त्यालाही गोळी घालण्यात आली.

पोलिसांनी डेट्रॉयटमध्ये 3 जणांची हत्या करणाऱ्या हल्लेखोराचे छायाचित्र जारी केले आहे. पोलिसांनी हल्लेखोरांकडून आणखी काही जणांना धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे.
पोलिसांनी डेट्रॉयटमध्ये 3 जणांची हत्या करणाऱ्या हल्लेखोराचे छायाचित्र जारी केले आहे. पोलिसांनी हल्लेखोरांकडून आणखी काही जणांना धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...