आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅलिफोर्निया:अमेरिकेत एका दिवसात 3 ठिकाणी गोळीबाराच्या घटना; 11 जण ठार

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत दोन दिवसांत गोळीबाराच्या दोन घटना घडल्या. त्यात ११ जणांचा मृत्यू झाला. पहिली घटना उत्तर कॅलिफोर्नियात घडली. हाफ मून बे शहरात बंदूकधाऱ्यांनी २ ठिकाणी गोळीबार करून ८ जणांची हत्या केली. हल्ल्यात ५ जण जखमी तर तिघे गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या ६७ वर्षीय जहाआे चुन्ली यास ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर रोपवाटिकेत नोकरीला होता. पहिला हल्ला त्याने नर्सरीजवळ केला. नंतर तो दुसऱ्या ठिकाणी गेला. आयोवा : शाळेत २ विद्यार्थी लक्ष्य आयोवाच्या डे मॉइन शहरातील शाळेत सोमवारी दुपारी गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यात तिघे जखमी झाले. २ भारतीय विद्यार्थ्यांची हत्या : शिकागोच्या प्रिन्सटन पार्कमध्ये दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर एकाचे प्राण वाचले. ऑकलंड : गॅस स्टेशनजवळ अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेत सोमवारी एकाचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले.

बातम्या आणखी आहेत...