आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • International
 • 3 Types Of Corona Worldwide, Type 'A' Damage In The United States; Claim From A Cambridge University Study

न्यूयॉर्क:जगभरात कोरोनाचे 3 प्रकार, अमेरिकेत ‘ए’ टाइपने हानी; केंब्रिज विद्यापीठातील अभ्यासातून दावा

न्यूयॉर्क3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
 • कॉपी लिंक
 • विषाणूचे मूळ स्ट्रेन सप्टेंबरपासून चीनमध्ये होते

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर आता नवे वुहान बनले आहे. अमेरिका पूर्व व पश्चिम अशा दोन्ही किनाऱ्यांवर महामारीचा सामना करत आहे. त्यामागील कारण ठरले ते सर्वाधिक घातक टाइप ए. अमेरिकेत कोरोनाचा हा प्रकार सक्रिय आहे. या विषाणूचे तीन टाइप जगभरात पसरले आहेत, असा दावा केंब्रिज विद्यापीठाने एका अभ्यासाद्वारे केला आहे. 

अभ्यासानुसार कोरोना आधी वटवाघळापासून अनेक जनावरांपर्यंत पसरला. त्यानंतर वुहानमध्ये मानवी संसर्ग झाला. मानवावर हल्ला करणारा टाइप -ए हाच असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. हा विषाणू जास्त दिवस चीनमध्ये राहिला नाही. आता तो अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियात त्याचा कहर पाहायला मिळत आहे. टाइप-ए चे बदललेले रूप टाइप-बी आहे. त्यानेच चीनमध्ये हजारो लोकांचे प्राण गेले. त्यानंतर टाइप बी युरोप, दक्षिण अमेरिका व कॅनडाला पोहोचला. कोरोनाचा टाइप-सी तिसरा प्रकार आहे. टाइप सी ने सिंगापूर, इटली व हाँगकाँगमध्ये आतापर्यंत हजारो लोकांचे प्राण घेतले. अमेरिकेच्या माऊंट सिनाई रुग्णालयाच्या जिनोमवर आधारित अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा कहर करणारा विषाणूचा प्रकार युरोपातून आला. 

टाइप - A

 • वटवाघूळ व खवल्या मांजरीत कोरोना
 • प्रादुर्भावासाठी विषाणूचा हाच प्रकार कारणीभूत मानला जातो.
 • चीननंतर हळूहळू संपूर्ण जगात संसर्ग झाला

टाइप - B

 • वुहानमध्ये आढळलेल्या विषाणूचेच परिवर्तित रूप.
 • ए टाइपमध्ये म्युटेशनने बनला, संसर्गाचे मूळ कारण.
 • अत्यंत धोकादायक.

टाइप - C

 • टाइप टूचे पुढचे रूप. एकच म्युटेशन वेगळे दिसून येते.
 • युरोपमध्ये सिंगापूरमधून या प्रकारच्या विषाणूचा प्रादुर्भाव.
 • पहिल्या दोन प्रकारांइतका हा प्रकार घातक नाही.

विषाणूचे मूळ स्ट्रेन सप्टेंबरपासून चीनमध्ये होते

 • विषाणूची जेनेटिक हिस्ट्री लक्षात यावी यासाठी २४ डिसेंबरपासून ४ मार्च दरम्यान अभ्यास केला.
 • केवळ चीनमधूनच नव्हे तर युरोपातून कॅरियर्सद्वारे अमेरिकेपर्यंत प्रादुर्भाव निष्पन्न.
 • ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या लोकांवर ३१ जानेवारीपासून बंदी लावली होती, युरोपला ११ मार्चला बंदी.
 • या दरम्यान इटली व स्पेनमध्ये रुग्ण संख्येत वाढ झाली होती. परतणाऱ्या लोकांमुळे वाढ.
 • विषाणूचा मूळ स्ट्रेन गेल्या वर्षी सप्टेंबरपासूनच चीनमध्ये फिरत होता, असे स्पष्ट होते.
 • अमेरिकेत ए टाइप, बी टाइप या दोन्ही विषाणू प्रकारांचा परिणाम. त्यामुळे मृत्यू वाढले.
 • न्यूयॉर्कमध्ये संसर्ग वाढण्यामागे युरोपातून आलेले लोक व चीनमधून आलेल्या बी टाइपमुळे कहर झाला.
 • ब्रिटन, बेल्जियम, डेन्मार्क, फिनलँड, जर्मनी, फ्रान्स, स्पेनमध्ये बी-टाइपचा जास्त परिणाम.
 • सी टाइपमुळे सिंगापूर, इटली व हाँगकाँगमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला.
 • जगात बी-टाइपचा सर्वाधिक प्रादुर्भाव होत असल्याचे डेटाच्या आधारे सांगण्यात येते.
बातम्या आणखी आहेत...