आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रॅगनची रणनीती:तैवान बेटांवर गेल्या महिन्यात चीनच्या 30 ड्रोनची भरारी

जेन पेरेझ अॅमी, चांग चिएन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरुवातीला तैवानच्या सैनिकांनी चीनमधून आलेल्या ड्रोनकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांच्या उड्डाणांची संख्या वाढली तेव्हा त्यांनी इशारा म्हणून गोळ्या झाडल्या. अखेर सैनिकांनी समुद्रात एक ड्रोन पाडले. गेल्या महिन्यात ३० ड्रोन चीनच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील तैवानमधील दोन बेटांवर घिरट्या घालताना दिसले. त्यांच्यावर शस्त्रे नव्हती. ड्रोन नागरी किंवा अज्ञात होते, परंतु त्यांचे लक्ष्य स्पष्टपणे डोंगराळ भागात तैनात तैवानचे सैनिक होते. ड्रोनच्या वारंवार उड्डाणांमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. चीनने तैवानच्या आखातात लढाऊ विमाने आणि युद्धनौकांची हालचाल वाढवली आहे.

तैवान नॅशनल पॉलिसी फाउंडेशनचे विश्लेषक चीह चुंग म्हणतात की, तणाव वाढवण्यासाठी चीन जाणीवपूर्वक अशा पद्धती वापरत आहे. तथापि, नागरी ड्रोनचा लष्करी उद्देशांशी काहीही संबंध नाही, असा अंदाज बांधणे योग्य नाही. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, युद्ध विमानांव्यतिरिक्त चिनी सैन्याने गेल्या आठवड्यात तैवानजवळ चार ड्रोन पाठवले. चीनने गुरुवारी टीबी-००१ हे लढाऊ ड्रोन पाठवले. शुक्रवार, शनिवारी दोन टोही ड्रोन पाठवण्यात आले.

चिनी ड्रोनची उड्डाणे तैवान सरकारवर कठोर प्रत्युत्तर देण्यासाठी दबाव आणत आहेत. हे युद्धाचे मानसिक धोरणदेखील आहे. पेंटागॉन या अमेरिकन संरक्षण विभागाचे माजी अधिकारी ड्रयू थॉमसन म्हणतात की, तैवानचे सैन्य चिनी लढाऊ विमानांना सामोरे जाण्यास सक्षम आहे, परंतु अशा रणनीतींचा सामना करण्याचा अनुभव त्यांच्याकडे नाही. तैवानचे सैन्य २० व्या शतकातील युद्धासाठी तयार आहे, परंतु २१ व्या शतकातील युद्ध लढण्यासाठी त्यांनी बदल करणे आवश्यक आहे.

प्रचाराचा नवीन स्रोत चीन गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी लष्करी ड्रोनचा वापर करू शकतो. नागरी ड्रोन हे तैवानची प्रतिमा बिघडवण्याच्या उद्देशाने देशांतर्गत प्रचाराचा नवा स्रोत आहे. तैवानच्या दोन सैनिकांचे ड्रोनने घेतलेले फोटो चीनच्या सोशल मीडियावर दाखवण्यात आले. ते असहाय व आश्चर्यचकित दिसतात. चीनच्या शियामेन शहरातील उंच इमारती व तैवानच्या सैनिकांची असहाय अवस्था काही चित्रांमध्ये दिसून आली.

बातम्या आणखी आहेत...