आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संसर्ग:जगभरात 30 कोटी रुग्ण, पाच महिन्यांत 10 कोटी; फ्रान्समध्ये एका दिवसात 2.61 लाखांवर बाधित

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात शुक्रवारी कोरोना रुग्णांची संख्या ३० काेटींपेक्षा जास्त झाली आहे. कोरोनाच्या डेल्टा व ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे बाधितांची आकडेवारी वाढू लागली आहे. संसर्गाच्या पहिल्या वर्षात रुग्णांची संख्या १० काेटींवर गेली हाेती. त्याच्या पुढील सहा महिन्यांत हा आकडा २० कोटींवर पाेहाेचला. मात्र नंतरची १० काेटी संख्या केवळ पाच महिन्यांत गाठली गेली. अमेरिका, फ्रान्स, आॅस्ट्रेलियात अलीकडे रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. अमेरिकेतील तज्ञ अँथनी फाउची म्हणाले, भलेही संख्या वाढत असेल, परंतु अमेरिकेसह जगभरात रुग्णालयात दाखल हाेण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

फ्रान्समध्ये एका दिवसात २.६१ लाखांवर बाधित
फ्रान्समध्ये एका दिवसात २.६१ लाख रुग्ण आढळून आले. दहा दिवसांत येथे आणखी वाईट स्थिती येऊ शकते. दरराेज सुमारे तीन लाखांवर रुग्ण येण्याची शक्यता वर्तवली जाते. लंडनच्या रुग्णालयांत लष्कराला तैनात करण्यात आले आहे. काेराेना संसर्गाच्या बाबतीत अमेरिका अजूनही जगभरात क्रमांक एकवर आहे. शुक्रवारी अमेरिकेत सहा लाख नवे बाधित आढळून आले.

बातम्या आणखी आहेत...