आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये मोठा अपघात:ट्रक-बसच्या धडकेत 30 ठार, 40 हून अधिक जखमी; पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात झाला अपघात

मुझफ्फरगडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सोमवारी बस-ट्रकच्या धडकेत 30 प्रवासी ठार झाले. यामध्ये महिला आणि मुलांचा देखील समावेश आहे. या अपघातात 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. यापैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मुझफ्फरगडमधील डेरा गाझी खानजवळ तनुसा रोडवर हा अपघात झाला.

मीडिया रिपोर्टनुसार बस वेगाने जात होती. जिल्हा आपत्कालीन अधिकारी डॉ.नय्यर आलम यांनी सांगितले की, बसमध्ये 75 प्रवासी होते. त्यातील बहुतेक मजूर होते, जे ईदच्या उत्सवात सुटीसाठी घरी जात होते. बस सियालकोटहून राजनपूरकडे जात होती. कमिश्नर डॉ. इरशाद अहमद यांनी सांगितले की, मदत व बचाव दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांचे आणि जखमींचे मृतदेह डेरा गाझी खान परिसरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी सांगितले की, ते या घटनेवर नजर ठेवून आहेत.

बातम्या आणखी आहेत...