आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत हरित ऊर्जेचे माध्यम बनलेली लाखो सौर पात्यांची आता मुदत संपत आहे. मात्र, तरीही लाखो पॅनल अजूनही अनेक वर्षे कार्यरत राहू शकतात. अशी पाती आशियासह विकसनशील देशांत ग्रीन एनर्जीीची गरज पूर्ण करतील.
ही हायटेक सामग्री केवळ प्रदूषण पसरवणारा कचरा होण्यापासून वाचवणार नाहीत तर ग्रीन एनर्जीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात मदत करतील. विकसनशील देशांतील घरांत, शेतकरी आणि व्यावसायिक विकसित देशांतून येणाऱ्या स्वस्त सौर पात्यांचा वापर करत आहेत. जपानमध्ये एका ट्रेडिंग हाऊसने अशा प्रकारच्या पॅनलसाठी ब्लॉकचेन मार्केट बनवण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेतील अशा प्रकारच्या पात्यांचा उपयोग नायजेरियातील शेतांत पाण्याच्या मोटारसाठी केला जात आहे. अमेरिकेतील वापरलेल्या सामग्रीशी संबंधित व्यावसायिकांना वाटते की, पुढे जाऊन सोलर पॅनलचा पुनर्वापर कापड व्यवसायाला मागे टाकेल. अमेरिकेतील अक्षय्य ऊर्जा प्रयोगशाळेच्या(एनआरईएल) अहवालानुसार, ३००० फुटबॉल मैदानासमान सोलर पॅनल २०३० पर्यंत निवृत्त होतील. इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सीनुसार(आयआरईएनए) २०३० पर्यंत ४% पॅनल वापरात नसतील. २०५० पर्यंत दरवर्षी कमीत कमी ५० लाख टन सोलर पॅनल कचरा तयार करतील. अमेरिकेतील सौर ऊर्जा क्षमता पुढील ४ वर्षांत २०२७ पर्यंत वार्षिक २१% च्या सरासरीने वाढण्याची अपेक्षा आहे.
सोलार पॅनलद्वारे प्राप्त कच्ची सामग्री १५ अब्ज डॉलरपर्यंत सोलार पॅनलमध्ये चांदी आणि तांब्यासह अनेक मौल्यवान धातू असतात. २०५० पर्यंत सोलर पॅनलद्वारे प्राप्त होणाऱ्या कच्च्या सामग्रीची किंमत १५ अब्ज डॉलरपर्यंत होऊ शकेल. चांदी, तांबे व अन्य धातूंचे रिसायकलिंग होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.