आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकानपूरच्या बेकनगंजमध्ये शुक्रवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पीएफआय) कनेक्शन असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा मास्टरमाइंड हयात जफर हाश्मीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस आयुक्त विजयसिंह मीणा शनिवारी म्हणाले, कानपूरचे वातावरण खराब करणाऱ्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) व इतर कारवाया केल्या जातील.
त्यांच्या मालमत्तांवर बुलडोझर चालवले जातील. ते म्हणाले, हाश्मीसोबत मुख्य आरोपी जावेद अहमद खान, मोहंमद राहिन व मोहंमद सुफियानलाही अटक झाली. घटनेनंतर मुख्य आरोपीने कानपूर सोडून पलायन केले होते. आरोपी जावेद एशियन व्हाईस पोस्ट यूट्युब चॅनल चालवतो. त्याचे कार्यालय लखनऊच्या हजरतगंजमध्ये आहे. त्याचा इमारतीत तो साथीदारांसह दडून बसला होता. तेथेच त्यास पकडण्यात आले.
चंद्रेश्वरला मारण्यासाठी जमावाने हातात बॉम्ब आणले होते
तिसरा एफआयआर मुकेश नावाच्या व्यक्तीने नोंदवला आहे. हजारोंचा जमाव बॉम्ब हाती घेऊन चंद्रेश्वर हातेला मारण्यासाठी चालून आला होता, असे त्यात नमूद केले आहे. जमावाच्या हाती बॉम्ब, लाठ्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.