आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

57 %चा आजारी कर्मचाऱ्यांना नकार:बॉसने समर्पित कर्मचारी समजावे यासाठी 38 % लोक आजारात ऑफिसला येतात

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बरेच कर्मचारी हे सर्दी, पडसे, ताप असतानाही कार्यालयात येतात. काही कर्मचाऱ्यांमध्ये ही प्रवृत्ती असते. अमेरिकेत नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.

सर्वेक्षणानुसार, बॉस आणि सहकाऱ्यांना दाखवण्यासाठी ३८% कर्मचारी सर्दी, पडसे आणि ताप असताना कार्यालयात येतात. मात्र, ५७% लोकांना वाटते की, आजारी असताना त्यांच्या सहकाऱ्यांनी ऑफिसला येऊ नये. सर्वेक्षणात सहभागी ४२% लोकांनुसार, त्यांचा सहकाऱ्यांवर कमी विश्वास राहतो. दुसरीकडे, ३४% कर्मचारी जास्त आजारी असल्यावरच सुटी घेणे पसंत करतात. एवढेच नव्हे तर २१% असे दाखवू इच्छितात की, ते आपल्या कामाप्रति किती बांधिल आहेत. त्यामुळे आजारी असतानाही कार्यालयात येत आहेत. १८% लोक इतरांवर विश्वास ठेवत नाहीत.

सर्दी असताना ऑफिसमध्ये सहकाऱ्यापासून दूर राहा हिवाळ्यात तुम्हाला सामान्य सर्दीचे लक्षण जाणवत असेल तर आणि तुम्हाला कामावर जाणे गरजेचे असेल तर काळजी घेणे आवश्यक आहे. काही औषध घेणे, सकाऱ्यापासून अंतर राखल्याने त्यांना संसर्गापासून वाचवता येईल.

बातम्या आणखी आहेत...