आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआठवड्यात मोबाइलचा चार ते सहा तासांचा वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. ते उच्चरक्तदाब व मानसिक तणावाचे कारण ठरू शकतो. चीनमध्ये अलीकडेच झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. त्यानुसार मोबाइलवर संभाषणाचा कालावधी वाढल्यास आजाराचा धोकाही वाढतो. मग भलेही युजर हँड्स-फ्री सेटअप वापर असेल. मोबाइलचा वापर करणाऱ्यांना मोबाइल वापर नसलेल्यांच्या तुलनेत उच्चरक्तदाबाची जोखीम ७ टक्क्यांनी वाढते. या अभ्यास प्रकल्पाचे नेतृत्व करणारे चीनच्या सदर्न मेडिकल युनिव्हर्सिटीचे प्रो. जियानहुई क्विन म्हणाले, मोबाइलवर संभाषणाचा हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जेवढे जास्त संभाषण तितकी जास्त जोखीम वाढते. ब्रिटिश नागरिकांच्या जीनसंबंधी व इतर आरोग्यविषयक माहितीचे यूके बायो बँकमधील डेटाचे विश्लेषण यात केले आहे. त्यात ३० पेक्षा जास्त वयाच्या २.१२ लाख लोकांच्या डेटाचे विश्लेषण झाले आहे. यात सहभागी लोकांच्या आरोग्यावर १२ वर्षे निगराणी ठेवण्यात आली.
आठवड्याला ३० मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त मोबाइलवर चर्चा करणाऱ्यांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. मोबाइलवर कमी बोलणाऱ्यांच्या तुलनेत तो जास्त आहे. संभाषणाचा कालावधीबरोबरच जोखमीही वाढते. आठवड्यात ३० ते ५९ मिनिटांत हा धोका ८ टक्के व १-३ तासांसाठी १३ टक्के, ४-६ टक्क्यांसाठी १६ टक्के व ६ तासांहून जास्तसाठी जोखीम २५ टक्क्यांनी वाढते. आनुवांशिकदृष्ट्या उच्चरक्तदाबाची जोखीम असलेल्या लोकांमध्ये आठवड्यात ३० मिनिटांहून कमी संभाषण ठेवल्यास जोखीम ३३ टक्के कमी होऊ शकते. प्रो. क्विन म्हणाले, आठवड्यात मोबाइल संभाषण अर्ध्या तासाहून कमी केल्यास धोका कमी होतो. मोबाइल कमी स्तरावरील रेडिआेफ्रिक्वेन्सी एनर्जीचे उत्सर्जन करतात. या अभ्यास प्रकल्पात त्याचा संबंध रक्तदाबाशी लावण्यात आला आहे. फोनमधील इलेक्ट्रॉमॅग्नेटिक फील्ड त्यास कारणीभूत असल्याचे मानले जाते. त्याचा ब्रेन ट्यूमरशी संबंध असल्याचे मानले जाते.
७२ टक्के स्मार्टफोन युजर कमी बॅटरीमुळे अँक्झायटीचे शिकार
एका पाहणीनुसार स्मार्टफोन युजरला फोनच्या २० टक्के किंवा त्यापेक्षा कमी बॅटरीला पाहून अँक्झायटीचा त्रास होऊ लागतो. असा सर्वाधिक ३१-४० हा वयोगट आहे. ६५ टक्के लोक बॅटरी लो झाल्याने बेचैन होतात. काउंटरपॉइंट रिसर्चच्या पाहणीत ही बाब समोर आली आहे. त्यात कमी बॅटरीमुळे भावनात्मक अस्वस्थतेला सहा श्रेणीत विभागण्यात आले. २८ टक्के सर्वाधिक अँक्झायटीच्या श्रेणीत समाविष्ट असल्याचे दिसून आले. म्हणजे बॅटरी ३०-५० टक्के कमी झाल्याने त्यांना अँक्झायटी जाणवू लागते. त्यामुळेच ४६ टक्के दिवसभरात दोनवेळा चार्जिंग करतात. ८७ टक्के लोक चार्जिंग करतानाच फोनचा वापर करतात. ४० टक्क्यांनी सकाळी झोपेतून जागे झाल्यानंतर, रात्री झोपतेवेळी शेवटचे काम म्हणून स्मार्टफोनचा वापर केल्याचे दिसून आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.