आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटन:7 महिन्यांनी एका दिवसात 4 मृत्यू, मृत्युदरात 70 टक्के घट, कोरोना लसीकरणानंतर चित्र पालटले

लंडन17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोराेना रोखण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेने आता जगभरात परिणाम दाखवण्यास सुरूवात केली. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे ब्रिटन ठरावे. कारण ब्रिटनमध्ये सात सप्टेंबरला ३ जणांचा मृत्यू झाला होता. परंतु हळूहळू हा आकडा वाढत गेला. मात्र लसीकरण सुरू झाल्यानंतर तेथे आता महामारीमुळे केवळ ४ जणांचा मृत्यूची नोंद झाली. याबरोबर कोरोनामुळे मृत्युदरात गेल्या सोमवारच्या तुलनेत ७० टक्के घट झाली. त्याव्यतिरिक्त ब्रिटनमध्ये नव्या कोरोना रुग्णांचा वेगही सुमारे १७ टक्के कमी झाला.

गेल्या आठवड्यात येथे ३५६८ रुग्ण आढळून आले होते. परंतु गेल्या चोवीस तासांत २९६३ रुग्ण आढळले. लसीकरणामुळे ब्रिटन सरकार उत्साहात आहे. नागरिकांसाठी आता ब्रिटन याचवर्षी बूस्टर डोस आणण्याच्याही तयारीला लागले आहे. बूस्टर डोसमुळे कोरोनाच्या कोणत्याही प्रकारच्या विषाणूशी लढण्यास मदत मिळणार आहे. आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला जूनपर्यंत लॉकडाऊनमधून बाहेर यायचे आहे. त्यासाठी जुलै अखेरीस देशातील सर्व वयस्करांना पहिला डोस दिला जाणार आहे. ५० वर्षांवरील सर्व लोकांना डोस देण्यात आला आहे. १७ मेपर्यंत अंतर्गत व बाह्य स्वरूपातील आयोजन व कामांना सुरूवात करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरू करण्याचीही तयारी आहे.

इस्रायलही लसीकरणानंतर लॉकडाऊनपासून मुक्त झाला. आता तेथील लोक चेहऱ्यावर मास्क नव्हे आनंद घेऊन बाहेर पडतील. इस्रायलमध्ये ८१ टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. मास्क घालून बाहेर पडण्याची अनिवार्यता तेथे आता संपली आहे. मास्क हटवण्याचा आदेश देणारा इस्रायल जगातील पहिला देश आहे. परदेशी लोकांना प्रवेश व विना लसीकरण इस्रायली लोकांना प्रवेश मर्यादित ठेवण्यात आला आहे. अशा लोकांचे विलगीकरण केले जात आहे. जास्त लोकसंख्येचे लसीकरण करण्यात भूतान सेशेल्सहून मागे आहे. तेथे ६७ टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. सेशेल्सची लोकसंख्या सुमारे एक लाख आहे. सुमारे २ कोटी लोकसंख्येच्या दक्षिण अमेरिकेतील देश चिली देखील लसीकरणाच्या शर्यतीत विकसित देशांपेक्षा पुढे आहे. चिलीत ४० टक्के लोकसंख्येला डोस देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...