आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलंड:गर्भपाताला घटनाबाह्य ठरवण्याच्या विरोधात एकवटले 4 लाख लोक, 30 वर्षांतील सर्वात मोठे आंदोलन

वॉर्साएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाॅर्सामध्ये झालेल्या आंदोलनाची तुलना १९८९च्या सार्वभौमत्व आंदोलनाशी करण्यात येत आहे

पाेलंडच्या सर्वोच्च न्यायालयाने २३ ऑक्टाेबरला ऐच्छिक गर्भपाताला घटनाबाह्य ठरवले आहे. त्याच्या विरोधात गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. सोमवारी रात्री देशभरातील जवळपास ४ लाख लाेक राजधानी वॉर्सा येथे एकवटले. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश हाेता. बाळंतपणाच्या वेळी सर्वात जास्त त्रास महिलांना हाेता. त्यामुळे गर्भ ठेवायचा की पाडायचा याचा अधिकार महिलांना असला पाहिजे. हे आंदोलन गेल्या ३० वर्षातील सर्वात माेठे आंदाेलन ठरले आहे. वाॅर्सा पोलिसांच्या मते, न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात देशभरात अंदाजे ४०० ठिकाणी निदर्शने झाली.

१९८९ च्या आंदोलनाशी तुलना

वाॅर्सामध्ये झालेल्या आंदोलनाची तुलना १९८९च्या सार्वभौमत्व आंदोलनाशी करण्यात येत आहे. सार्वभौमत्व नावाच्या कामगार संघटनांच्या आंदोलनामुळे पोलंडमध्ये डाव्यांची सत्ता संपुष्टात आली हाेती. दुसरीकडे मानवाधिकार संघटनांच्या मते सत्ताधारी कायदा आणि न्याय पक्षाच्या राज्यात सामान्य लाेकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे, जे डाव्यांच्या सत्तेनंतर माेठ्या मुश्किलीने पाेलंडच्या लाेकांनी मिळवले आहे.