आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 4 People Injured In Bomb Blast In Lahore, Media Report Claims The Blast Happened Near The House Of Terrorist Hafiz Saeed Involved In Mumbai Attack

पाकिस्तानात स्फोट:लाहोरमध्ये झालेल्या स्फोटात 2 ठार, 17 जखमी; मीडिया रिपोर्टमध्ये दावा- मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदच्या घराजवळ झाला स्फोट

लाहोरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तान पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांनी आयजीला घटनेची चौकशी करुन लवकरच अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत

पाकिस्तानच्या लाहोरमधील जौहर शहरात स्फोट झाला आहे. यात 2 लोकांचा मृत्यू आणि 17 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी मीडिया डॉनच्या म्हणण्यानुसार, एहसान मुमताज हॉस्पिटल जवळील ई ब्लॉकमध्ये हा स्फोट झाला, अशी माहिती बचाव करत असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईद याच्या घराजवळ हा स्फोट झाला असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.

लाहोरचे सीसीपीओ गुलाम महमूद डोगर यांनी माध्यमांना सांगितले की, सर्व जखमींना जिन्ना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅस पाइपलाइन किंवा गॅस सिलिंडर फुटल्याने हा स्फोट झाल्याचे बचाव पथकाच्या सदस्याने सांगितले. याबद्दल अद्याप परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. या स्फोटात जवळपासच्या घरांचेही नुकसान नुकसान झाले आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, त्याचे घर फक्त 6 वर्षांपूर्वी बांधले गेले होते, त्या स्फोटात पूर्णपणे डॅमेज झाले आहे.

त्याचबरोबर पाकिस्तान पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांनी आयजीला घटनेची चौकशी करुन लवकरच अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेस जबाबदार असणार्‍यांवर कारवाई केली जाईल असे ते म्हणाले. यासह स्फोटात जखमी झालेल्यांना आरोग्य सुविधा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...