आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरेक्‍यांकडे रॉकेट लाँचर होते:खैबर पख्तुनख्वात दहशतवादी हल्ल्यात 4 पोलिस ठार

इस्लामाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा राज्यातील लक्की मारवतच्या बार्गी पोलिस ठाण्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात रविवारी चार पोलिस ठार तर अन्य जखमी झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पोलिस ठाण्याच्या दिशेने हातबॉम्ब आणि रॉकेट फेकले. यानंतर दहशतवादी आणि पोलिसांत चकमक उडाली. घटनेनंतर पोलिसांनी परिसराची पाहणी केली. सूत्रांनुसार या हल्ल्यात एका हेड कॉन्स्टेबलसह तीन ठार तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. राष्ट्रपती अरिफ अल्वी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. दहशतवाद पूर्ण नष्ट करण्यासाठीचे प्रयत्न सुरूच राहतील,असे अल्वी यांनी सांगितले. खैबर पख्तुनख्वात गुरुवारी पोलिसाचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...