आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुबई:यूएईत लोकसंख्येच्या 4 पट चाचण्या, 90% लोकांना लसीचा पहिला डोस, तर 39% जणांना दिले दोन्ही डोस

दुबई / शानीर एन सिद्दिकी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैद्यकीय कर्मचाऱ्यांबद्दल आभार व्यक्त करताना अधिकारी. - Divya Marathi
वैद्यकीय कर्मचाऱ्यांबद्दल आभार व्यक्त करताना अधिकारी.
  • असा देश, ज्याने रुग्णांना 5 स्टार हॉटेलमध्येही क्वॉरंटाइन केले, आठवड्यात दोन चित्रपट दाखवले

आम्ही संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) कोरोनावर बोलतो तेव्हा एक गोष्ट इतर देशांपेक्षा वेगळी दिसली. सरकारने आधी लोकांच्या मनातून कोरोनाची भीती दूर केली. मग संसर्गावर नियंत्रण मिळवले. जनजीवन पुन्हा सुरळीत झाले आहे. मात्र, प्रत्येक जण फिजिकल डिस्टन्सिंग आणि सर्व सावधगिरी अजूनही बाळगत आहे. ही लढाई मानसिक व इतर पातळ्यांवर लढली गेली. गेल्या वर्षी मार्चमध्ये सरकारने पद्धतशीरपणे लॉकडाऊन केले. आधी शाळा व धार्मिक स्थळे बंद केली. मग टप्प्याटप्प्याने अनावश्यक आस्थापना बंद केली. रात्रीतील सर्व व्यवहार थांबवले. येथील लोकांना लाॅकडाऊनचा त्रास झाला नाही, कारण योग्य कारणासाठी बाहेर जाण्यासाठी ऑनलाइन परवाना सहज मिळायचा. किराणा दुकान आणि कोराेना नसलेल्या रुग्णांसाठीचे दवाखाने कधीच बंद झाले नाहीत. दुसरे म्हणजे, येथील लोकांचा सरकारवर विश्वास आणि सरकारकडून लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे, यामुळे सर्वांना खरी माहिती भेटत राहिली व सर्वांनी आपल्या पातळीवर काळजी घेतली. हॉटस्पॉट्सवर लक्ष ठेवणे असो की चाचणी वा हजारो खाटांचे रुग्णालय तयार करण्याचे, यूएई सरकारने प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकले. हा असा देश आहे, जेथे क्वॉरंटाइनमध्ये लोकांना ५ स्टार हॉटेल्समध्येही ठेवण्यात आले.

रुग्णालयात दाखल रुग्णांना आठवड्यातून दोन वेळा हॉलीवूड- बॉलीवूडचे चित्रपट दाखवण्यात आले. एखाद्या रुग्णाने ५ स्टार हॉटेल वा त्याच्या आवडीच्या खाण्याची व्यवस्था किंवा चित्रपट बघत असल्याचा व्हिडिओ शेअर केल्यास तो संदेश व्यवस्थेपेक्षा खूप मोठा असतो. यामुळे लोकांमधील भीती दूर झाली. सक्तीही करावी लागली. रमजानमध्येच अबुधाबी पोलिसांनी नियम मोडल्याने ३९ सामाजिक समारंभांवर दंड ठोठावला. येथे रमजानमध्ये १० पेक्षा जास्त लोकांच्या सभेवर बंदी आहे. आयोजकांना २ लाख आणि सहभागी होणाऱ्यास १ लाख रुपयांचा दंड आहे. दुबईत मार्चमध्ये ११ दुकाने सील करण्यात आली. सरकारने माहिती प्रणालीवर लक्ष ठेवले. पॉझिटिव्ह आढळल्यावर सरकारच्या आदेशानंतरही रुग्णालयात दाखल न होणे किंवा होम क्वॉरंटाइन नियम न पाळल्यास १० लाख रुपयांचा दंड आकारला. सुरुवातीला लोकांना चूक कळावी म्हणून वृत्तपत्रात त्यांचे छायाचित्र छापले गेले.

एक महिन्यापासून रोज १७०० ते २००० दरम्यान रुग्ण, एकूण ५ लाख प्रकरणे, १५७१ मृत्यू
संसर्गाबद्दल बोलायचे तर एक महिन्यापासून रुग्णांची संख्या १७००- २००० दरम्यान आहे. मात्र, ९७.७ लोकांच्या देशात १.२ कोटी लसींचे डोस दिले गेले आहेत. यात ९०% ना पहिला तर ३९.४% लोकांना दोन्ही डोस दिले गेले आहेत. देशातील लोकसंख्येच्या चारपट जास्त सुमारे ४.३ कोटी चाचण्या झाल्या आहेत.

परदेशी नागरिकांकडून एक रुपयाही घेतला जात नाही, प्रत्येक भाषेतील डॉक्टर व सल्लागार तैनात अडचण येऊ नये म्हणून हेल्थ व कॉल सेंटरवर सर्व भाषांचे जाणकार डॉक्टर- सल्लागार. मार्चमध्ये व्हिजिट व्हिसावर आलेले बंगालचे सुवम पॉल सांगतात, येथे आल्यानंतर पॉझिटिव्ह झालो. १४ दिवस क्वॉरंटाइनमध्ये देखरेखीखाली राहिलो. आवडीचे भारतीय जेवण मिळाले. यासाठी एक रुपयाही लागला नाही.

लोकांनी विश्वास ठेवला, बंदी मानली, चाचणीसाठी रांगा लागल्या
चाचणीतून तोडली संसर्गाची साखळी, रुग्ण कमी होऊनही फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचे पालन
देशातील संपूर्ण ९७.७ लाख लोकांची कोरोना चाचणी आणि लसीकरण क्रांतिकारी निर्णय ठरला. लोकांच्या मनातून कोरोनाची भीती गेली होती, यामुळे चाचणी केंद्र व ड्राइव्ह थ्रू चाचणी केंद्रांवर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसल्या. कोणाच्याही मनात चाचणी व लसीकरणाबाबत कोणताच गैरसमज नाही.

रुग्णांची चाचणी व पूर्ण उपचार मोफत, आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी सतत असतात संपर्कात
१८ एप्रिलला पॉझिटिव्ह आढळलेले बाबर सिद्दिकी सांगतात, अहवाल आल्यानंतर आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने फोन करून आधी विचारपूस केली. मग एका केंद्रावर बोलावून सर्व चाचण्या, ऑक्सिजन, एक्सरे, सीटी स्कॅन केल्यानंतर औषधी दिली. प्रशासनाला प्रकृतीवर लक्ष ठेवता यावे म्हणून एक वॉच बँडही देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...