आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 40 50 Patients Entered From Nepal Into India; Following The Alert, Patrolling The Indo China Border Increased

घुसखोरी:नेपाळमधून भारतात घुसले 40-50 रुग्ण; सतर्कतेनंतर भारत-चीन सीमेवर गस्त वाढवली

पाकिस्तानचा कट3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
  • आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या बिहारमध्ये दक्षता वाढवण्यात आली

पटणा काेराेनाे व्हायरसचा भारतात फैलाव करण्यासाठी पाकिस्तानी म्हाेरक्याच्या अादेशावरून या विषाणूंचा संसर्ग झालेले घुसखोर माेठ्या संख्येने नेपाळच्या रस्त्याने देशात प्रवेश करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अांतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या बिहारमध्ये दक्षता वाढवण्यात अाली अाहे. 

पश्चिम चंपारणचे जिल्हाधिकारी कुंदनकुमार यांनी इतर पाेलिस अधीक्षकांना यासंदर्भात सतर्क करणारे एक पत्र लिहिले अाहे. भारत-नेपाळपासून जवळपास १२० किलाेमीटर लांबीच्या सीमेवर संशयास्पद घडामाेडींवर नजर ठेवण्यासही सांगितले अाहे. 

शस्त्रे अाणि बनावट नाेटांची तस्करी करणाऱ्या नेपाळच्या म्हाेरक्याने महामारी पसरवण्याची याेजना अाखल्याची माहिती सशस्त्र सीमा दलाच्या (एसएसबी) गुप्तचर विभागाने दिली असल्याचे कुमार यांनी सांगितले. नेपाळमार्गे ४० ते ५० संशयित संक्रमित भारतात घुसले असल्याची माहितीही त्यांनी दिली अाहे. विशेष शाखेच्या पाेलिस अधीक्षकांनी यासंदर्भात चंपारण पाेलिस अधीक्षकांना विशेष संदेश पाठवून सतर्क राहण्यास सांगितले.

बातम्या आणखी आहेत...