आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजादूटोणा हा एक असा विषय आहे,ज्याचे नाव ऐकताच लोकांमध्ये वेगळीच प्रतिमा तयार होते. मात्र, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आताच्या तंत्रज्ञान युगातही जगातील १ अब्जाहून अधिक लोक जादू-टोनावर विश्वास ठेवत आहेत. प्यू रिसर्चने ९५ देशांत केलेल्या पाहणीत ही बाब समाेर आली आहे.
४०% लोकांनी अंधश्रद्धेसोबत हडळ, चेटकीणीवरही विश्वास ठेवतात. यामध्ये जवळपास सर्व देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, शैक्षणिक पातळी आणि आर्थिक सुरक्षेसोबत अंधश्रद्धेवरील विश्वासाच्या पातळीत देशा-देशांत खूप अंतर आहे. एकीकडे स्वीडनमध्ये ९% हूनही कमी लोकांचा जादूटोण्यावर विश्वास आहे तर ट्युनिशियात ९०% हून अधिक लोकांचा यावर विश्वास आहे. अभ्यासात अंधश्रद्धा आणि चेटकिणीवर विश्वासाचा थेट संबंध सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक स्तर, सांस्कृतिक मान्यता, सामाजिक-आर्थिक पातळी आणि घटनात्मक संस्थांशी आहे. २००८ ते २०१७ दरम्यान झालेल्या या पाहणीत लोकांना धार्मिक मान्यता आणि अंधश्रद्धा तसेच हडळ, चेटकिणीशी संबंधित प्रश्न विचारले हाेते. अमेरिकी विद्यापीठातील समाजशास्त्रज्ञ व प्रमुख संशोधक बोरिस गेर्शमेन मानतात की, अशा श्रद्धेमुळे अनेक ठिकाणी संघर्षाचे कारण ठरले आहे. चीन व भारतातील अधिक डेटाची आवश्यकता आहे. सर्व्हेनुसार, स्वित्झर्लंड, नॉर्वे संसदेत चेटकिणीचा त्रास व उपचाराबाबतचा प्रस्ताव आलेला आहे.
आधी केलेल्या हत्यांवर स्पेन संसदेने माफी मागितली स्पेनच्या केटालोनियात गेल्या वर्षी संसदेत एक प्रस्ताव मंजूर झाला. त्यात हडळ, चेटकीण ठरवून मारलेल्या महिलांना त्यांना दोषमुक्त केले. संसदेने या सर्व हत्यांसाठी सार्वजनिक माफी मागितली हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.