आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत टीव्हीचा सुवर्णकाळ संपत असल्याचे चित्र आहे. २०१९ च्या तुलनेत जवळपास ४०% प्रेक्षकांनी टीव्ही पाहणे बंद केले आहेे. यूट्यूब-फेसबुकसारख्या मोठ्या कंपन्यांनीही आपले टीव्ही प्रकल्प गुंडाळले आहेत. मालिकांची निर्मिती करणाऱ्या बहुतांश कंपन्या कर्जबाजारी झाल्या आहेत. या वर्षीच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या ३५० पेक्षा अधिक नवीन टीव्ही कार्यक्रमांच्या ऑर्डर रद्द करण्यात आल्या आहेत.
अमेरिकेतील प्रसिद्ध रिसर्च फर्म अॅम्पियर अॅनालिसीसच्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सुरुवातीच्या सहा महिन्यांत प्रेक्षकांची संख्या २४% पर्यंत कमी झाली आहे. दशकात पहिल्यांदाच नेटफ्लिक्सचेही दर्शक घटले आहेत. मनोरंजन कंपन्यांचे शेअर्स कोसळले आहेत. अॅम्पियरचे संशोधक फ्रेड ब्लॅक सांगतात, की कंपन्यांनी आपल्या केबल व्यवसायातील तोटा स्ट्रीमिंगद्वारे भरून काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात म्हणावे तसे यश आले नाही. डिस्नेसारख्या कंपनीला आपल्या स्ट्रीमिंग विभागातून १२.५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीने सीईओ बॉब शॅपेक यांना हटवले आहे. आता गुगल, अॅपल, अॅमेझॉन आणि ईएसपीएनसारख्या कंपन्या एनएफएल गेम्सची स्ट्रीमिंग करू इच्छित आहेत. मनोरंजन कंपन्यांनी जाहिरातींचे दर कमी केले आहेत. सर्व कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. अन्य खर्चातही कपात केली जात आहे. अॅपल टीव्ही+ सिरीजचे निर्माते कार्सोन सांगतात, की माझ्याजवळ सध्या अनेक नवीन प्रोजेक्ट आहेत, मात्र मनोरंजनाचा बाजार अचानक संपुष्टात येत आहे.
एनबीसी एंटरटेनमेंट अँड वार्नर मीडियाचे माजी अध्यक्ष रॉबर्ट ग्रीनब्लॅट सांगतात, की ४-५ वर्षांपूर्वीपर्यंत टीव्हीचा सुवर्णकाळ होता. फोनवर कार्यक्रमांच्या ऑर्डर दिल्या जायच्या. वाॅर्नर ब्रोस डिस्कव्हरी, पॅरामाउंटसह केवळ ३ मोठ्या कंपन्यांच्या टीव्ही कार्यक्रमाच्या ऑर्डर २२-२७% कमी झाल्या आहेत. स्क्रिप्टेड मालिकांमुळे लोकांचा भ्रमनिरास झाला आहे.
भारतात टीव्हीचे प्रेक्षक २०२१ मध्ये कोरोनापूर्वपेक्षा कमी अमेरिकाच नव्हे तर भारतातही टीव्हीचे प्रेक्षक घटत आहेत. स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार, कोरोनाच्या आधी २०१८ मध्ये जवळपास १.६० लाख कोटी अॅव्हरेज मिनिट ऑडियन्स (एएमए) होते. २०१९ मध्येे १.६१ लाख कोटी एएमए, २०२० मध्ये १.७३ लाख कोटी आणि २०२१ मध्ये १.५९ लाख कोटी एएमए राहिले. २०२० मध्ये लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांची संख्या वाढली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.