आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहमती:ईयूच्या कंपन्यांत मंडळावर महिलांना 40% राखीव जागा, लिंग समानतेच्या दिशेने मोठे पाऊल

लंडन22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युरोपीय संघातील २७ सदस्य राष्ट्रांच्या शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांना यापुढे आपल्या कार्यकारी मंडळावर किमान ४० टक्के महिला सदस्यांसाठी जागा राखीव ठेवााव्या लागतील. ही सहमती अलीकडेच झालेल्या एका करारानुसार झाली. कार्यकारी व इतर क्षेत्रातदेखील किमान ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवाव्या लागतील. हे आरक्षण लागू करण्यासाठी कंपन्यांकडे २०२६ च्या मध्यापर्यंतची मुदत असेल. या करारावर प्रतिक्रिया देताना युरोपीय संसदेत ऑस्ट्रियाचे सदस्य एव्हलिन रेग्नर सोशल मीडियावर म्हणाले, नव्या नियमामुळे ईयूमध्ये लिंग समानतेची प्रक्रिया जाेर धरेल आणि सर्वांसाठी समान संधी असेल.

युरोपीय संसद व युरोपीय संघातील २७ सदस्य राष्ट्रांकडून अधिकृतरीत्या संमती मिळवणे हे पुढचे पाऊल ठरेल. त्यानंतर संपूर्ण ईयूमध्ये हा कोटा लागू होईल. नव्या कायद्याचा उद्देश कार्यकारी मंडळावरील भरतीच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त पारदर्शकता आणणे होय. त्यासाठी कंपन्यांपुढे स्पष्ट असे उद्दिष्ट ठेवणे होय. एका पदासाठी समान योग्यतेचे जास्त उमेदवार असलेल्या ठिकाणी कमी प्रतिनिधित्व असलेल्या वर्गातील उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

बातम्या आणखी आहेत...