आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-चीन सीमा वाद:गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत चीनी यूनिटच्या कमांडिंग ऑफिसरसह 40 सैनिक ठार, भारताच्या 4 जवानांची प्रकृती चिंताजनक 

लडाख10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशच्या लाहौल-स्पीती आणि किन्नौर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांच्या सीमा या चीनशी जोडलेल्या आहेत
  • ब्रिटेनने म्हटले - आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून, भारत आणि चीनने चर्चा करुन प्रश्न सोडवावा, हिंसा करुन कोणाचाही फायदा होणार नाही

भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये गालवन खोऱ्यात चकमक झाली. आता हे प्रकरण गंभीर झाले आहे. न्यूज एजंसीने बुधवारी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या चकमकीमध्ये चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक मारले गेले आहे. यामध्ये त्यांच्या यूनिट कमांडिंग ऑफिसरचाही समावेश आहे. ज्या यूनिटने भारतीय सैन्यावर हल्ला चढवला त्याच यूनिटचा कमांडिंग ऑफिसर मारला गेला आहे. दरम्यान भारताच्या 4 जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. 15-16 जून दरम्यान रात्री गालवान खोऱ्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये भारताच्या कमांडिंग ऑफिसरसह 20 जवान शहीद झाले होते. तर 135 जवान हे जखमी झाले आहेत. 

चकमकीच्या जवळपास 36 तासांनंतर पहिल्यांदा भारताकडून निवेदन जाहीर करण्यात आले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, गालवान येथील सैनिकांनी मोठे साहस दाखवले आहे. देश त्यांचे बलिदान नेहमी लक्षात ठेवेल. लडाखमधील 14 हजार फूट उंच गलवान खोऱ्यात तीन तास चाललेल्या या चकमकीत जगातील दोन अणु सैन्यामध्ये चकमक झाली. हा हल्ला दगड, लाठ्या आणि धारदार शस्त्रांनी करण्यात आला. 

याच गलवान खोऱ्यामध्ये 1962 च्या युद्धा 33 भारतीय शहीद झाले होते. दुसरीकडे भारताने चीनच्या बाजूने झालेल्या चर्चेला रोखले आहे. यानुसार चीनमधून 43 सैन्य जखमी झाल्याची माहिती आहे, परंतु चीनने या वृत्ताला अद्यापही कबुली दिलेली नाही. 

बातम्या आणखी आहेत...