आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • 41 Crore Deposited In Nepal Pm Oli's Geneva Bank Account; The Report Claims To Be Receiving Bribes From China

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:नेपाळचे पंतप्रधान ओलींच्या जिनेव्हातील बँक खात्यात 41.34 कोटी जमा; चीनकडून लाच मिळत असल्याचा अहवालात दावा

न्यूयाॅर्क6 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • नियमांना धाब्यावर बसवून नेपाळच्या ओली सरकारने चीनच्या कंपन्यांना दिली कामे

अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या देशांतील भ्रष्ट नेत्यांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा डाव चीनकडून आखला जात आहे. आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांत चीनने त्यांचे विस्तारवादी धोरण राबवले आहे. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या माध्यमातून चीनने नेपाळमध्ये शिरकाव केला आहे. यासाठी ओलींना लाच दिल्याचा दावा ग्लोबल वॉच अॅनालिसिसच्या अहवालात करण्यात आला आहे.

अहवालात म्हटले आहे की, मागील काही वर्षांत ओलींची संपत्ती वेगाने वाढत आहे. त्यांनी इतर देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी केली असून त्या मोबदल्यात चीनच्या अनेक व्यापारिक योजना त्यांनी नेपाळमध्ये लागू केल्या आहेत. ओली यांच्या स्वित्झर्लंच्या जिनेव्हातील मिराबॉड बँक खात्यात दीर्घकालीन ठेव व शेअर्सच्या रूपात जवळपास ४१.३४ कोटी रुपये जमा आहेत. ओली व पत्नी राधिका शाक्य यांना वार्षिक १.८७ कोटींचा नफाही मिळतो. दाव्यानुसार, ओली यांनी २०१५-१६ मध्ये पहिल्या कार्यकाळात कंबोडियाच्या टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात गुंतवणूक केली होती. त्या वेळी नेपाळमध्ये चीनच्या राजदूत वू चुन्टाई यांनी त्यांना मदत केली होती. ओली यांच्या जवळचे उद्योजक अंग शेरिंग शेरपा यांनी या करारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या व्यवहारात कंबोडियाचे पंतप्रधान हूं सेन व चीनचे मुत्सद्दी बो जियांगेओ यांनी मदत केली होती. नियमांना धाब्यावर बसवून त्यांनी २०१८ मध्ये डिजिटल अॅक्शन रूम उभारण्याचे कंत्राट चीनच्या हुवावे कंपनीला देण्यात आले. मे २०१९ मध्ये नेपाळ टेलिकम्युनिकेशनने हाँगकाँगच्या चीनी कंपनीसोबत रेडिओ एक्सेस नेटवर्क तयार करण्यासाठी करार केला. यंदा चीनची कंपनी जेटीईसोबत फोर जी नेटवर्कसाठी करार करण्यात आला आहे.

चीनकडून खरेदी केलेल्या ६२१ कोटींच्या टेस्टिंग किटमध्येही भ्रष्टाचार

यावर्षी जूनमध्ये नेपाळने चीनकडून ६२१ कोटी रुपये खर्चून कोरोनासाठी प्रोटेक्टिव्ह गिअर्स व टेस्टिंग उपकरणे घेतली. यातील बहुतांशी उपकरण खराब होती व किंमतही जास्त होती. यात अपहार झाल्याचा आरोप करत नेपाळमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती. या प्रकरणात आरोग्य मंत्री व ओलींच्या जवळच्या सल्लागारांविरुद्ध तपास सुरू आहे.    

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser