आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना मृतांच्या आकड्यावरून वाद:भारतात 47 लाख मृत्यू : WHO; सरकार म्हणते - आकडा चुकीचा असून दहापट जास्‍त आहे

जिनेव्हा /नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे २०२०-२१ मध्ये जगात १.५० कोटी लोकांचा मृत्यू झाल्याचे डब्ल्यूएचओने सांगितले आहे. गुरुवारी जारी अहवालानुसार, भारतात ४७ लाख मृत्यू झाल्याचा डब्ल्यूएचओचा दावा आहे. तो अधिकृत आकड्यापेक्षा सुमारे १० पट जास्त आहे. दुसरीकडे, भारत सरकारने डब्ल्यूएचओच्या मूल्यांकनाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अभ्यास मॉडेल संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय सूत्रानुसार, ‘आम्ही अधिकृत चॅनलद्वारे विरोध नोंदवू. डेटावरील आक्षेप कार्यकारी मंडळात मांडले जातील.’ केंद्र सरकारच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, हा डेटा १७ राज्यांवर आधारित आहे. या राज्यांची निवड कोणत्या आधारे केली, डेटा केव्हा घेतला याची माहिती आम्हाला दिली नाही. सरकारने याबाबत १० पत्रे लिहिली, पण डब्ल्यूएचओने उत्तर दिले नाही. एम्स दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले,‘भारतात जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीची मजबूत यंत्रणा आहे. त्यानुसार एवढे जास्त मृत्यू झाल्याचे समोर आले नाही.’ सरकारी आकड्यांनुसार भारतात कोरोनामुळे ५.२४ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...