आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत लोकशाहीची पाळेमुळे आता हादरू लागली आहेत. याहू न्यूज व युगोव संस्थेच्या पाहणीत आगामी काळात अमेरिकेतील लोकशाही संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर आहे, असे ४९ टक्के लोकांना वाटते. विशेष म्हणजे हा विचार केवळ एखाद्या राजकीय पक्षाच्या समर्थकांचा नाही. रिपब्लिकन तसेच डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये याबाबत एकमत दिसून येते. ५५ टक्के डेमोक्रॅट्स व ५३ टक्के रिपब्लिकन समर्थकांनी भविष्यात मोठ्या प्रमाणात अमेरिकेतील लोकशाही संपुष्टात हाेऊ शकते, असे मत व्यक्त केले आहे. परंतु अमेरिकेत अजूनही लोकशाही कायम राहील, असे मानणाऱ्यांचे प्रमाण २५ टक्के होते. इतर २५ टक्के अमेरिकन नागरिक या मुद्द्यावर आपले निश्चित मत व्यक्त करत नाहीत. पाहणीत १० पैकी ४ पेक्षाही कमी नागरिकांना गृहयुद्ध होईल, असे वाटत नाही.
मात्र ५२ टक्के रिपब्लिकन समर्थकांना आपल्या जीवनभरात एक गृहयुद्ध पाहायला मिळेल, असे वाटते. ४६ टक्के डेमोक्रॅटिक समर्थकदेखील या मताला पाठिंबा देतात. स्वतंत्र विचारांच्या ५० टक्के लोकांना देखील गृहयुद्धाची भीती वाटते. संकटाच्या काळात सरकारच्या विरोधात शस्त्र उचलण्याचा मुद्दा केवळ ४७ टक्के अमेरिकन नागरिक नाकारतात. गरज पडल्यास सरकारच्या विरोधात शस्त्रे उचलण्यास गैर मानत नसलेल्यांचे प्रमाण २६ टक्के आहे. हिंसाचाराबद्दल बोलणारे ट्रम्प यांचे ३१ टक्के समर्थक आहेत तर बायडेन यांना १५ टक्के जणांचा पाठिंबा आहे.
२०२१ मधील कॅपिटल हिंसाचारानंतरची पाहणी
२०२१ मध्ये अमेरिकन संसद कॅपिटलवर ट्रम्प यांच्या समर्थकांनी हल्ला केला होता. हाच या पाहणीचा आधार मानला जातो. त्याची १० जूनपासून सुनावणी सुरू झाली होती. यासंबंधीच्या खटल्याच्या सुनावणीत देशातील १ हजार ५४१ लोकांपैकी २५ टक्क्यांहून कमी अमेरिकन नागरिकांनी रस दाखवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.