आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेश:हिंदूंच्या लोकसंख्येत चार दशकांमध्ये 5 टक्के घट, अवामी लीगच्या सत्ताकाळात असुरक्षिततेची भावना

ढाका | नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेशात हिंदूंवरील हल्ले, मंदिरांची तोडफोड, जाळपोळीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायाचा आवाज दडपला गेला. त्यामागे हिंदू समुदायाची लाेकसंख्या कमी हाेणे हे कारण सांगितले जाते. चार दशकांच्या काळात हिंदूंची लाेकसंख्या पाचने घटून ८.५ टक्क्यांवर आली आहे. हिंदूंचे पलायन माेठ्या संख्येने भारतात हाेते. राजकीयदृष्ट्या प्रचंड उपेक्षित हाेणे हा बांगलादेशातील हिंदूंच्या दृष्टीने अतिशय माेठा धाेका मानला जाताे. पारंपरिक हिंदू मतदार हा बांगलादेशात सत्ताधारी अवामी लीगचा समर्थक राहिला आहे. पंतप्रधान शेख हसीना स्वत:ची आेळख धर्मनिरपेक्ष अशी सांगून हिंदूंना सुरक्षा देण्याचे आश्वासन देत आल्या आहेत. परंतु हल्ल्यांच्या घटनांवर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यात त्यांनाही यश आले नाही. अवामी लीग २००९ पासून सत्तेवर आहे. परंतु सातत्याने हल्ले हाेत आहेत. बांगलादेशी अल्पसंख्याक संघटना बीएचबीसीयूसीचे राणा दासगुप्ता म्हणाले, पलायनामुळे संख्या कमी हाेत आहे.

सुरक्षेची आश्वासने म्हणजे बाेलाची कढी..
डाव्या गटातील गणसमिती आंदाेलनाचे जुनैद साकी म्हणाले, सत्ताधारी अवामी लीग अल्पसंख्याक, त्यातही हिंदूंना सुरक्षा देण्याबद्दल बाेलते. परंतु प्रत्यक्षात देशात असे चित्र दिसत नाही. कारण साकी यांच्यासारखे नेते केवळ सभांतून आश्वासने देतात. हिंदूंवरील हल्ल्याचा विशिष्ट पॅटर्न दिसून येताे. काही सामग्री साेशल मीडियावर पाेस्ट केली जाते. त्याला इस्लामच्या विराेधात असल्याचे संबाेधले जाते. त्यानंतर कट्टरवादी गट हिंदूंवर हल्ल्याचे फर्मान साेडतात. त्यानंतर हल्ल्याचे सत्र सुरू हाेते. पाठाेपाठ सरकारकडून विधाने करण्यास सुरुवात हाेते. ही गाेष्ट आता अल्पसंख्याक हिंदू समुदायाला आता लक्षात आली आहे. परंतु राजकीय पातळीवर हिंदूंची उपेक्षा हाेते.

हिंदूंचा नरसंहार, भाजपचे सरकार गप्प का : स्वामी
भाजप नेता व राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ल्याच्या घटनांवर केंद्र सरकारला टाेला लगावला आहे. ते म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आता गप्प का आहे? सरकारला बांगलादेशची भीती वाटते का? स्वामी म्हणाले, लडाखमध्ये चिनी घुसखाेरी, तालिबानशी वाटाघाटींच्या प्रयत्नांनंतर आता आपण बांगलादेश, मालदीवलाही घाबरणार आहाेत का? सरकारने आवाज उठवावा.

गुन्हा दाखल केल्यानंतरही कारवाई हाेत नाही
दासगुप्ता म्हणाले, मागील सरकारच्या काळात हिंदूंवर हल्ल्यानंतर गुन्हा दाखल हाेत नव्हता. सरकारकडून तशा प्रकारचे आदेश दिले जायचे. आता अवामी लीगच्या सरकारच्या काळात गुन्हे दाखल हाेत आहेत. परंतु दाेषींवर कारवाई हाेत नाही. अल्पसंख्याकांशी संबंधित एएसके संघटनेच्या नीना गाेस्वामी म्हणाल्या, सामान्यपणे समाजात प्रभाव असलेली व्यक्ती गुन्हे दाखल हाेऊ देत नाही. गुन्हा दाखल झाला तरी कारवाई हाेत नाही.

बातम्या आणखी आहेत...