आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 5 Percent Of Children Up To 11 Years Of Age In Europe Wish To Change Sex, A Problem Of Precocious Puberty

दिव्‍य मराठी विशेष:युरोपात 11 वर्षांपर्यंतच्या 5 टक्के मुलांची लिंग बदलाची इच्छा, अकाली किशोरावस्थेची समस्या

कोपेनहेगन9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत बहुतांश पालक आपल्या मुलांना लिंगाधारित शिक्षण देऊ इच्छित नाहीत. काही पाहण्यांमधून ही बाब स्पष्ट झाली. त्यामुळे मुलांची लिंग आेळख आणि शारीरिक विकास यादरम्यान असलेला संबंध शोधण्यासाठी अॅरहूस विद्यापीठाने एक पाहणी केली. त्यात चकित करणाऱ्या अनेक बाबींचा दावा करण्यात आला आहे. मुलांना अकाली किशोरवयात येण्याची इच्छा होऊ लागली आहे. एवढेच नव्हे तर अकरा वर्षांच्या मुलांमध्ये जेंडर बदलण्याची इच्छा वाढली आहे, असा दावा या पाहणीतून करण्यात आला. पाच टक्के मुलांनी अांशिक किंवा पूर्ण स्वरूपात लिंग बदलाची तयारी दर्शवली आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारची पाहणी झाली आहे. त्यासाठी सहभागी प्रत्येक मुलांकडून त्यांच्यात सहा महिन्यांत होणाऱ्या बदलाविषयीची माहिती घेण्यात आली. जेंडर बदलण्याची इच्छा व्यक्त करणारी मुले इतरांच्या तुलनेत दाेन महिने अगाेदरच किशाेरावस्थेत आलेले होते. या संशोधन प्रकल्पासाठी ‘ बेटर हेल्थ फॉर जनरेशन्स’ प्रकल्पाच्या डेटाचा देखील वापर करण्यात आला. १९९६ मध्ये सुरू झालेल्या प्रकल्पात डेन्मार्क येथील एक लाख महिलांचा समावेश होता. त्यांची गर्भावस्था, प्रसुतीपासून मूल मोठे होईपर्यंतचे अध्ययन सुरू ठेवण्यात आले होते. मुले अकरा वर्षांची झाल्यानंतर त्यांचा किशोरावस्थेवरील प्रकल्पात समावेश केला गेला. निष्कर्षाआधी आणखी अध्ययनाची गरज आहे. त्यामुळे अचूक कारणांचा वेध घेता येईल.

बालरोगतज्ज्ञांसाठी अहवाल महत्त्वाचा किशोरावस्थेत आलेल्या मुलांचे निदान करताना बालरोगतज्ज्ञांसाठी या संशोधनाचा अहवाल महत्त्वाचा ठरतो. अकाली किशोरावस्थेत दाखल झाल्याने मुलांचे वागणे बदलू शकते. म्हणून त्यासाठी याबाबतची माहिती आवश्यक ठरते.

बातम्या आणखी आहेत...