आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी ४२ शहरांना केंद्र देणार प्रत्येकी ५० कोटींचा निधी; एनकॅपच्या नुसार २०२५पर्यंत वायू प्रदूषण ३०% पर्यंत कमी करण्याचे लक्ष्य

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व शहरांची विशेष कार्ययोजना तयार
देशातील १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या ४२ शहरांमध्ये वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी २२१७ काेटी रुपयांची तरतूद करण्यात अाली आहे. या शहरांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांना १५व्या वित्त आयोगाच्या शिफारशीवरून सरासरी ५० कोटी रुपये दिले जातील.

नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (एनकॅप) नुसार हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी २०१७ च्या स्थितीच्या आधारे २०२४- २५ पर्यंत वातावरणातील धूलिकणांचे प्रमाण २०-३०% पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एनकॅप देशातील त्या १२२ देशांसाठी तयार करण्यात आला आहे, जी हवेच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रीय मानकांवर खरे उतरलेले नाहीत. सर्व शहरांनी विशेष कार्ययोजना तयार केली आहे. या ४२ शहरांपैकी ३३ शहरे अशी आहेत जी एनकॅपमध्ये सामील १२२ शहरांच्या यादीतही आहेत. सर्वाधिक प्रदूषित शहर असल्यामुळे दिल्ली व एनसीआरसाठी गेल्या वर्षी वेगळे कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट स्थापन करण्यात आले आहे. यात एनसीआरच्या शहरांचाही समावेश करण्यात आला आहे.

अनेक मजली पार्किंग, सायकल झोनही बनवणार
वायू प्रदूषण रोखण्यासाठी कार्ययोजनांमध्ये मल्टिलेव्हल पार्किंग, इलेक्ट्रिक वाहनासंाठी चार्जिंग स्टेशन, सायकल झोन, रिमोट सेन्सिंग आधारित पीयूसी यंत्रणा, चौकात फवारे, मोकळ्या जागांवर गवत व हिरवळ वाढवण्यासारखे उपाय केले जाऊ शकतात. रस्ते सफाईसाठी यंत्र, फवारणीसाठी स्प्रिंकलरचाही प्रस्ताव कार्ययोजनेत आहे.

औरंगाबाद, नाशिक, पुण्यासह ४२ शहरांचा योजनेत समावेश
औरंगाबाद, बृहन्मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, वसई- विरार, विजयवाडा, विशाखापट्‌टनम, पाटणा, दुर्ग-भिलाई नगर, रायपूर, अहमदाबाद, राजकोट, सुरत, बडोदे, फरिदाबाद, धनबाद, जमशेदपूर, रांची, बंगळुरू, भोपाळ, ग्वाल्हेर, इंदूर, जबलपूर, अमृतसर, लुधियाना, जोधपूर, जयपूर, कोटा, चेन्नई, मदुराई, तिरुचिरापल्ली, हैदराबाद, आग्रा, अलाहाबाद, गाझियाबाद, कानपूर, लखनऊ, मेरठ, वाराणसी, आसनसोल आणि कोलकाता यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

समस्या मान्य करणे, त्यावरील तोडग्याची सुरुवात
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, कोणतीही समस्या मान्य करणेच तोडगा काढण्याची सुरुवात आहे. दिल्लीच नव्हे तर देशातील सर्व शहरे वायू प्रदूषणाच्या तावडीत सापडल्याचे आपण मान्य केले आहे तर त्याची पातळी जाणून घ्यायची आहे. यासाठी देखरेख स्थानकांची संख्याही वाढवली जात आहे. त्यानुसार प्रत्येक शहर कार्ययोजना लागू करत आहे.

बातम्या आणखी आहेत...