आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमध्ये ब्रँडेड मास्कचा माेठा वापर:डाेळे सुंदर दिसावे म्हणून 50 टक्के जपानी लोकांच्या ताेंडावर अजूनही मास्क

जपान2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानमध्ये काेराेनाचे सर्व निर्बंध संपुष्टात आले. परंतु अजूनही मास्कचा वापर माेठ्या प्रमाणात केला जाताे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार लाेक मास्क घालत नाहीत. तरुण वर्ग फॅशनच्या स्वरूपात त्याचा वापर करू लागला आहे. त्याशिवाय शारीरिक व्यंग दडवण्यासाठी उदाहरणार्थ खराब दात, चेहऱ्यावरील डाग इत्यादी मास्कमुळे दिसत नाहीत. म्हणूनच डिझायनर किंवा ब्रँडेड मास्कचा वापर वाढला आहे. चुआे विद्यापीठातील एका संशाेधनानुसार ५० टक्के जपानी मास्कचा वापर काही ना काही कारणामुळे करत आहेत.

विद्यापीठातील प्राे यामागुची मसामी यांना संशाेधनात काही गाेष्टी आढळून आल्या. सेलिब्रिटी लाेकांना मास्क परिधान करण्यासाठी प्रेरित करत आहेत. त्याशिवाय मास्क घालण्याची सवय लागलेल्या लाेकांना त्यापासून दूर राहण्याचे उपायदेखील सांगितले जात आहेत. टीकाकार याेनाहा जून म्हणाल्या, पश्चिमेकडील देशांत सक्ती केल्यास तेथील नागरिकांना ती स्वातंत्र्यावर गदा वाटू लागते. परंतु जपानमध्ये प्रत्येकाने एखादी गाेष्टी केल्यास ती याेग्य वाटू लागते. विनाशेव्ह मास्क घालून कुठेही फिरता येऊ शकते, असाही एक मास्क परिधान करण्याचा फायदा सांगण्यात येताे. मास्कमुळे डाेळे सुंदर दिसू लागतात, असे मत काही तरुणींनी व्यक्त केले. काही लाेक मास्कला काआे पँटसू किंवा फेस वियर म्हणतात. वयस्करांमध्ये मासुकु बिजिन किंवा मुखवट्यामुळे चेहऱ्याचे साैंदर्य दिसून येते.

मास्क परिधान करण्याची सवय सहजासहजी जात नाही जपानचे सेलिब्रिटी जवाचिन म्हणाले, मास्कची सवय एकदम सुटत नाही. त्यासाठी तुम्हाला सराव करावा लागताे. त्यासाठी आधी मास्क आपल्या नाकाखाली ठेवा. नंतर आेठांखाली व शेवटी हनुवटीखाली मास्क ठेवून ताे साेडता येऊ शकताे.

बातम्या आणखी आहेत...