आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 5,000 Afghans Stranded In Pakistan After Bribing Taliban, Trapped In Makeshift Camp For A Month And A Half

बेघरांची व्यथा:तालिबानला लाच देऊन पाकमध्ये गेलेले 5 हजार अफगाणी अडकले, दीड महिन्यापासून अस्थायी छावणीत

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालिबानने सत्ता मिळवल्यापासून अफगाणिस्तानातून पलायन सुरू आहे. काही नागरिकांना १५ ऑगस्ट २०२१ नंतर अमेरिका व पाश्चात्त्य देशांनी आश्रय दिला आहे. परंतु मायदेश सोडणाऱ्या इतर अफगाणी नागरिकांवर भटकण्याची वेळ आली आहे. गेल्या दीड महिन्यात पाकिस्तानातील इस्लामाबादच्या अस्थायी छावणीत आश्रयाला आले आहेत. या छावणीत सुमारे ५ हजारांहून जास्त अफगाणी वास्तव्याला असून खुले आकाश हेच त्यांचे छत झाले आहे. घरेदारे सोडून कुटुंबकबिल्यासह पाकिस्तानात आलेल्या या नागरिकांना भविष्याची चिंता सतावू लागली आहे. त्यापैकी एक अहमद जिया फैज म्हणाले, तालिबानला सुमारे ७५ हजार रुपयांची लाच देऊन पाकिस्तानात दाखल झालो आहोत. परंतु पाक सरकार आता जबाबदारी झटकू पाहत आहे. पाश्चात्त्य देशही आश्रय देत नाहीत.

15 लाख एकूण स्थलांतरित पाकिस्तानात, संयुक्त राष्ट्राची माहिती 13 लाख अफगाण वंशीय पाकमध्ये आश्रयाला.

मायदेश सोडणे ही मोठी वेदना
स्थलांतरितांपैकी खदिजा म्हणाल्या, मायदेश सोडणे ही मोठी वेदनादायी गोष्ट असते. आम्हाला अफगाणिस्तानात राहणे मुळीच शक्य वाटत नसल्याने अफगाण सोडावा लागला. आता मात्र आमची परिस्थिती वाईट आहे. आम्ही धड मायदेशी परतू शकत नाही आणि पाकिस्तानातही राहणे कठीण झाले आहे. कारण पाकिस्तानात रोजगार मिळत नाही. तशा काही सुविधा नाहीत. पाकमध्ये राहण्यासाठी वैध कागदपत्रेही आमच्याकडे नाहीत. पोलिस त्रास देतात.

युक्रेनमधून आंतरराष्ट्रीय समुदायाने श्वानही वाचवले, मग आम्हाला मदत का नाही? इस्लामाबाद येथील अस्थायी छावणीतील अफगाणी नागरिकांमध्ये संतप्त भावना दिसून येते. अफगाणिस्तानात शिक्षिका राहिलेल्या मीना खलील म्हणाल्या, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पाश्चात्त्य देशांनी मदत दिली. तेथून नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. एवढेच नव्हे तर श्वानही सुरक्षित काढण्यात आले. ही कृती आंतरराष्ट्रीय समुदायाचा दुटप्पीपणा दर्शवणारी आहे. आम्हा पाच हजारांवर जास्त अफगाणी नागरिकांबद्दल कुणाला काही वाटत नाही. एवढी आमची दयनीय स्थिती आहे का? कारण आमची कुणीही दखल घेत नाही. तालिबान राज्यात महिलांना काहीही अधिकार नाहीत. मग आम्ही तेथे कसे राहणार? अन्य एक महिला खदिजा म्हणाल्या, माझे पती पोलिस अधिकारी होते. तालिबानचे राज्य आल्यानंतर त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. खदिजा तीन मुलांसह इस्लामाबादच्या छावणीत गेल्या दीड महिन्यापासून वास्तव्याला आहेत.

बातम्या आणखी आहेत...