आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबांग्लादेशात महागाईचा बॉम्ब फुटला आहे. येथील सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात एका झटक्यात तब्बल 52 टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे संतप्त झालेली जनता रस्त्यावर उतरलेत. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, 1971 मध्ये स्वतंत्र मिळाल्यानंतर प्रथमच देशातील इंधनाच्या किंमती एवढ्या उंचीवर पोहोचल्यात.
सरकारच्या मते, जागतिक बाजारात तेलाचे दर वाढल्यामुळे देशातील इंधन दरात वाढ करावी लागली आहे. बांग्लादेशात पूर्वीपासून जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भीडलेत. त्यातच आता पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे स्थिती अधिकच गंभीर झाली आहे.
नाराज जनतेचे आंदोलन
इंधन दरवाढीमुळे बांग्लादेशी नागरिक रस्त्यावर उतरलेत. ते म्हणाले -सरकारने पेट्रोलच्या किंमतीत 51.7 व डिझेलच्या किंमतीत 42 टक्के वाढ केली आहे. यामुळे आम्हाला अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सरकारने काय म्हटले?
सरकारने म्हटले आहे की, मागील 6 महिन्यांत बांग्लादेश पेट्रोलिअम कॉर्पोरेशनला (सरकारी तेल कंपनी) सुमारे 8 अब्ज टक्याचे (बांग्लादेशी रुपया) नुकसान झाले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळेही जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर भडकलेत. त्यामुळे दरवाढीशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर घसरले, तर पुन्हा तेलाच्या दरात कपात केली जाईल.
महागाईमुळे स्थिती बिकट
देशातील महागाई दर मागील 9 महिन्यांपासून सातत्याने 6 टक्क्यांच्या वर आहे. जुलैमध्ये बांग्लादेशाचा महागाई दर 7.48 टक्क्यांवर पोहोचला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.